esakal | वर्सोव्यात संगीतकार ठरला सेक्सटॉर्शनचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Sex racket.jpg

वर्सोव्यात संगीतकार ठरला सेक्सटॉर्शनचा बळी

sakal_logo
By
अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: समाज माध्यम (social media) वापरत असताना समोरचा व्यक्ती खरा आहे की खोटा याचा अंदाज घेणे फार कठीण होते. विशेष करून अशा व्यक्तींसोबत मैत्री करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, नाहीतर हे भामटे आपल्याला अडचणीत आणू शकतात. असाच काहीसा प्रकार वर्सोव्यात राहणा-या एका उद्योन्मुख संगीतकारासोबत (Music director) घडला आहे. (young music director victim of whatsapp video call in mumbai versova area)

फेसबुसवर ओळख झालेल्या मैत्रीणीने व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील छायाचित्र घेऊन त्याच्याकडून सव्वा लाखांची खंडणी उकळली आहे. वारंवार होणा-या मागणीला कंटाळून अखेर त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

हेही वाचा: न्यूड फोटो लीक करण्याची धमकी, दादरमधील ब्लॅकमेलिंगची घटना

तक्रारदार हा 21 वर्षाचा असून वर्सोवा येथे राहतो. फेसबुकवर त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. दोघांचे चॅटींग झाल्यानंतर एकमेकांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले. त्यावरून त्यांचे संभाषण सुरू होते. 27 मे ते 28 मेच्या दरम्यान त्याला या तरुणीचा व्हॉट्स अ‍ॅप व्हिडिओ कॉल आला होता. त्यावेळी त्याला तरुणीने अश्लील गोष्टी करण्यास सांगितल्या.

हेही वाचा: मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचे

त्याने त्या केल्यानंतर तरुणीने त्याचे व्हिडिओचे छायाचित्र घेतले. त्याच्या सहाय्याने तक्रारदार तरुणाला वारंवार धमकवण्यास व पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानेही लाजेपोटी पैसे पाठवले. त्याने एक लाख 15 हजार रुपये आरोपीला पाठवले. पण त्यानंतरही त्यांची मागणी वाढल्यामुळे अखेर तक्रारदाराने याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.