अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांची किंमत आहे फक्त एवढी, तुम्ही किती रुपये देताय ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

औषधांची जास्त दराने विक्री केल्यास होणार कारवाई

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे जगभरामध्ये मोठया प्रमाणावर मनुष्यहानी झालीये लाखो लोकं कोरोना बाधीत  आहेत. अशातच होमिओपॅथी औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे सांगितले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर या औषधाचा खप वाढलेला आहे. या संधीचा गैरफायदा घेऊन काही मेडिकल स्टोअर्सधारकांकडून हे औषध हे औषध  किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री देखील होतेय. या संवेदनशील वेळी अधिक दराने औषधांची विक्री करताना कुणी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल  अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

मोठी बातमी -  ज्यांच्यामुळे आपल्याला जीवनदान मिळतंय त्यांनाच मिळेना ICU बेड्स, अखेर त्या डॉक्टर्सनी सोडला...

कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं असून यासाठी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचं सेवन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानं दिला होता. यानंतर या गोळ्यांना मोठी मागणी आली. हे औषध तयार करण्याचा खर्च, वाहतूक खर्च व इतर खर्च कमीत कमी नफा विचारात घेता 80 ते 100 गोळ्या असलेली एक बाटली जास्तीत जास्त 11 रुपयांपर्यंत विक्री करणे अपेक्षित आहे. मात्र, या औषधाचा खप वाढल्यामुळे काही मेडिकल स्टोअर्स व डॉक्टरांकडून अधिक किंमतीत याची व्रिकी केली जाते. 

मोठी बातमी -  मुळे आपल्याला जीवनदान मिळतंय त्यांनाच मिळेना ICU बेड्स, अखेर त्या डॉक्टर्सनी सोडला...

त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा व सामाजिक बांधिलकीचा विचार करता सर्व मेडीकल स्टोअर्स आणि होमीओपॅथीची प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स यांनी अर्सेनिक अल्बम-30 या औषधाच्या एका बॉटलची किंमत ही 11 रुपयांपेक्षा जास्त आकारु नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत़. तसेच अर्सेनिक अल्बम-30 या एका बाटलीवर एमआरपीपेक्षा जास्त किंमत आकारल्यास संबंधित  मेडिकल स्टोअरधारकावर कारवाई केली जाईल असे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.

if arsenic album 30 is sold above MRP action will be taken says FDA

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if arsenic album 30 is sold above MRP action will be taken says FDA