ज्यांच्यामुळे आपल्याला जीवनदान मिळतंय त्यांनाच मिळेना ICU बेड्स, अखेर त्या डॉक्टर्सनी सोडला...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

ICU बेड्सच्या कमतरतेमुळे फिरावी लागली रुग्णालये... 

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अत्यावश्यक सेवेतील पोलिसांसह डॉक्टर्स आणि परिचारिकांनाही आता आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी मुंबईतील सायन रुग्णालय आणि सोमैय्या रुग्णालयात 2 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामधील एक डॉक्टर चिंता कॅम्प , ट्रॉम्बे येथील जनरल फिजिशियन तर दुसरा अंधेरी पूर्वेकडील जनरल फिजिशियन (आयुर्वेद) असल्याचे कळले आहे. या 2 मृत्यूमुळे कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांनाही संख्या आता 5 झाली आहे.

मोठी बातमी - मुंबईत कोरोनाचं तांडव कायम, मुंबईत वाढलेत 'इतके' रुग्ण; मुंबईची रुग्णसंख्या ३६ हजारांच्या पार

चिता कॅम्प (ट्रॉम्बे) येथील 51 वर्षीय डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना 24 मे रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंधेरी पूर्व येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरचा करोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी सौमेय्या रुग्णालयात ही घटना घडली. सायन रुग्णालयात आयसीयू बेड्सच्या कमतरतेमुळे सुरुवातीला त्यांना कॅज्युअल्टीमध्ये पाठवून वेटिंग नंबर देण्यात आला आणि 26 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्याआधी त्यांनी शताब्दी रुग्णालयात ही प्रयत्न केला मात्र तेथेही आयसीयू बेड उपलब्ध झाला नसल्याने त्यांनी त्यांना सायन रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्ये केलं 'असं' काही आणि अबु आझमी यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा...

याबाबत महापालिका रुग्णालयांचे प्रमुख डॉ. रमेश भारमल यांना अधिक माहितीसाठी विचारणा केली असता अद्याप रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आला नसून मृत्यू कसा झाला याची माहिती मिळली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महापालिका रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचा सामना करण्यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वाढवून 430 करण्यात आली आहे. मुंबई शहरात सर्वाधिक रुग्ण आमच्याकडे येत आहेत. काही प्रमाणात हे कोविड रुग्णालयच झालं आहे. आम्हाला कोरोनाग्रस्त आणि कोरोना नसलेले अशा दोन्ही रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

two doctors of mumbai lost their life due to scarcity of ICU beds in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two doctors of mumbai lost their life due to scarcity of ICU beds in mumbai