
मुंबई- महाराष्ट्रात कोरोनानं हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या मुंबई बेस्ट बसनंही एक मोठा निर्णय घेतला आहे. बेस्ट कामगार कृती समितीने सोमवारपासून कामगार कामावर न जाता लॉकडाऊनचं पालन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे येत्या सोमवारपासून मुंबई बेस्ट बंद होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. बेस्ट कामगार कृती समितीनं हा निर्णय घेतला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या
बेस्ट प्रशासन कामगारांना सुरक्षा कवच देत नाही. तसंच स्वतंत्र उपचार सेवा देत नाही अशावेळी कामगारानं स्वतःचं रक्षण स्वतः करावं यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही काळापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या ही परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या प्रवासासाठी बेस्टकडून जवळपास 1200 हून जास्त बस सेवेत रुजू करण्यात आल्या होत्या. पण, बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं तणाव वाढला. कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्येही बेस्ट कर्मचाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय.
बेस्टमध्ये काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 95 हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बेस्ट प्रशासनाने कामगारांना सुरक्षात्मक साधन जसं मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे नाईलाजानं कृती समितीनं निर्णय घेतला असल्याचं कामगार नेत्यांचं म्हणणं आहे.
ही सर्व परिस्थिती आणि बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या मुद्द्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं अखेर सावधगिरी म्हणून बस सेवा बंद करण्याचं ठरवलं गेल्याचं कळत आहे. त्यामुळे सोमवारपासून बेस्टही 100 टक्के लॉकडाऊन पाळला जाणार असल्याचं चित्र आहे. बेस्ट कर्मचारी नेते शशांक राव यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
शशांक राव यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी बेस्टच्या शंभर टक्के लॉकडाऊनच्या निर्णयावर स्पष्टिकरण दिलं आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव असतानाही कर्मचारी स्वत:ची काळजी स्वत: हूनच घेत आहेत. परिस्थितीला मिळालेलं गंभीर वळण पाहता, आता बेस्टही पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
कामगारांना घरी राहण्याचं आवाहन
मुंबईतील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सेवेत बेस्ट बसचा समावेश आहे. सध्या 1501 इतक्या मोठ्या प्रमाणावर बस रस्त्यावर चालत आहेत. या अत्यावश्यक सेवेसाठी बेस्टचे जवळपास 3260 कामगार काम करताहेत. बेस्ट वर्कर्स युनियनने सोमवारपासून कामगारांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे.
काय होईल परिणाम
या अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत बस आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार या सर्वांना मुंबईच्या आणि मुंबईच्या बाहेरून ने आण करण्याच काम करताहेत. तसंच मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी 100 विशेष सेवा राबवण्यात आली. जर सोमवारपासून बस सेवा बंद झाल्यास या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा नाहक त्रास उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
If best buses in mumbai stop giving their services in mumbai then these thing will happen
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.