Mumbai Pollution News: मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका झाली सज्ज; घेतला हा महत्वाचा निर्णय घेतला!

Mumbai Pollution
Mumbai Pollutionsakal

Mumbai Pollution News: मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. याची गंभीर दखल घेत या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करा, अन्यथा अशी सर्वच बांधकामे रोखण्यात येतील, असा इशारा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे. या संबंधीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे २३ ऑक्टोबरपर्यंत केली जाणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.

परिणामी वायू प्रदूषणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महापालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकसकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.

Mumbai Pollution
Mumbai Crime: बेकायदेशीर बांग्लादेशींना पोलिसांनी केली अटक !

या बैठकीत आयुक्त चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठीचे विविध निर्देश दिले आहेत. या बैठकीला प्रधान सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह बांधकामे व विकास क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची फेर पडताळणी होणार
मुंबईतील रिफायनरींच्या परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाला सामोरे जावे लागते आहे. मुंबईतील वाढत्या बांधकामांच्या ठिकाणी धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहेत.

Mumbai Pollution
Mumbai Crime: बेकायदेशीर बांग्लादेशींना पोलिसांनी केली अटक !

त्यातच रिफायनरींमुळे या प्रदूषणात भर पडण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने रिफायनरीच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेशी फेरपडताळणी करण्याच्या सूचना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत. संबंधित यंत्रणा याबाबत लवकरच रिफायनरींच्या परिसरात हवेची गुणवत्ता तपासणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


उपायोजनेबाबत सुचना
- एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात (मेट्रो, रस्ते, उड्डाणपुलासहीत) बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी- पत्र्यांचे आच्छादन असावे. संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे.
- बांधकामाच्या ठिकाणी तुषार फवारणी यंत्रणा असावी. दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी.
- बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र बसवावे.
- प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.
- बांधकाम पाडतानासुद्धा आजुबाजूने आच्छादन करुन नंतरच बांधकाम पाडावे
- बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे.
- प्रत्येक विभागात पाहणी पथके तैणात करावीत.

Mumbai Pollution
Mumbai Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com