'संचमान्यतेतील त्रुटी दूर न केल्यास आंदोलन'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - संचमान्यतेतील त्रुटींमुळे अनेक शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आले आहे. ही प्रक्रिया बेकायदा असल्याचे सिद्ध होऊनही शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा प्रकार थांबलेला नाही. या संचमान्यतेतील त्रुटी दूर न केल्यास शिक्षकांच्या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिला आहे.

शिक्षक सेनेने अन्य मागण्याही केल्या आहेत. इयत्ता पाचवीत 20 किंवा त्याहून कमी विद्यार्थी असल्यास शिक्षक अतिरिक्त ठरतो. 21 ते 60 पटसंख्या असल्यास केवळ एका शिक्षकाची नियुक्ती होऊ शकते. हा निकष शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारा आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केला. 60 पेक्षाही कमी पटसंख्येला दोन शिक्षक मंजूर करावेत, अशी मागणी सेनेने केली आहे.

Web Title: If the error is not movement away set of compliance