सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडाल तर तुरुंगवारी, 'या' महापालिकेकडून नियमावली जारी

social distancing
social distancing
Updated on

नवी मुंबई : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या आकडेवारीमुळे महापालिका प्रशासनाने आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम वारंवार तोडणाऱ्यांना आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 

नवी मुंबई शहरात ३० एप्रिलपर्यंत २३० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण ३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाईन केले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. रोज महापालिकेतर्फे ५०० पेक्षा जास्त नागरिकांचे स्वॅब घेऊन चाचणीसाठी पाठवले जातात. रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून शहरातील ४६ जागा प्रतिबंधित विभाग म्हणून घोषित केल्या आहेत. गावठाणांतील भाजी मंडई, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यावर बंंधने आहेत. तरी सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचे सत्र सुरूच आहे. 

आजही शहरातील अनेक परिसरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांची ऐशी की तैशी केली जात आहे. एकमेकांमध्ये अंतर राखणे तर सोडाच; पण साधे तोंडाला मास्कही बांधण्याची तसदी काही बेशिस्त नागरिक घेत नाहीत. अशा महाभागांमुळे कोरोना अधिक फोफावत आहे. परंतु, आता महापालिकेने सोशल डिस्टन्सिंग पाळणारी एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार तोंडाला मास्क न लावणे, सार्वजनिक जांगेत थुंकणे, एकमेकांमध्ये सामाजिक अंतर न राखणे अशा प्रकारांना गुन्ह्याचे स्वरूप दिले आहे. तसेच त्यांच्यावर २०० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये अंतर राखण्याची व्यवस्था न केल्यास दुकानदारांवरही कारवाई होणार आहे. त्यांच्यावर दोन हजार रुपये दंड अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.

हे नियम मोडू नका 

  • सार्वजनिक जागेत तोंडावर रुमाल अथवा मास्क न लावणे : ५०० रुपये दंड / दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही
  • सार्वजनिक जागेत थूंकल्यास : एक हजार रुपये दंड / दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही
  • सार्वजनिक जागेत एकमेकांमध्ये ३ फुट अंतर न राखणे : २०० रुपये दंड / दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही
  • सार्वजनिक जागेतील दुकानदाराने ग्राहकांसाठी अंतर ठेवण्याची व्यवस्था न केल्यास : दोन हजार रुपये दंड /  दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दुप्पट दंड अथवा फौजदारी कारवाई अथवा दोन्ही

लॉकडाऊनमध्ये फिरण्यावर आलेली बंधने ही आपल्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्य हितासाठीच आहेत. त्यामुळे नियम तोडून दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका


If the rules of social distance are broken, then the rules of navi mumbai Municipal Corporation are issued

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com