
मुंबई : पालघर हत्याकांडप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) आणखी पाच जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 13 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
16 एप्रिलला मुंबईतील कांदिवलीहून गुजरातकडे जाणाऱ्यांची पालघरनजीक गावामध्ये निर्घुण हत्या झाली. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत 110 आरोपींना अटक केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. या प्रकरणात आणखी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना 13 मे पर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
पालघर हत्याकांडामध्ये 115 जण अटकेत असून त्यामध्ये 9 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटननंतर पोलिसांवरही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार काहींच्या बदल्या तर काही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास गृहविभागाने सीआयडीकडे सोपवला होता. त्यानंतर झालेली ही पहिलीच अटक आहे.
Palghar mob lynching: Five arrested by CID have been remanded in police custody till May 13
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.