मुंबईतल्या 'या' भागात पाणी साचल्यास येथे तक्रार नोंदवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

मुंबईत सध्या कोस्टल रोडचं काम सुरु आहे. त्यात मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोस्टल रोड प्रकल्पात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जातेय.

मुंबई : मुंबईत सध्या कोस्टल रोडचं काम सुरु आहे. त्यात मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोस्टल रोड प्रकल्पात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जातेय.  या प्रकल्पामुळे पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच  या प्रकल्पातील कामांमुळे पाणी सचल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान आणि वरळी डेअरी या ३ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेत.  महापालिकेनं याबाबतची माहिती दिली आहे. 

महत्वाची बातमी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, आज असा असेल पावसाचा जोर 

दक्षिण मुंबईतील शामलदास गांधी मार्ग, गिरगाव ते राजीव गांधी सागरी सेतू, वरळी यांना जोडणाऱ्या ९.९८ किमीच्या कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात आलं आहे.  बांधकाम सुरू असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन कोस्टल रोडचे प्रभारी प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केलंय. 

मोठी बातमी हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

नागरिक येथे तक्रार नोंदवू शकता 

अमरसन्स उद्यान नियंत्रण कक्ष

 • आपत्कालीन क्रमांक ०२२-२३६१०२२१
 • राकेश सिंग सिसोदीया, अधिकारी ९१६७०६११०६ प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार प्रतिनिधी देवेंद्र प्रसाद ९९६७०१४३६२
 • निवासी अभियंता राजेश जाधव ९७०२४६७५७५

वरळी डेअरी नियंत्रण कक्ष

 • आपत्कालीन क्रमांक ०२२-२४९००३५९
 • अविक पांजा, अधिकारी ८६५७५००९००
 • आजाद सिंग, अधिकारी ९८१९०२६५९५
 • प्रकल्प व्यवस्थापक स्वर्णेंदु सामंता ७०१६७६५०७६
 • शशिकांत एस. व्ही. ९१३६९९३७०३

प्रियदर्शिनी उद्यान एमएसआरडी नियंत्रण कक्ष

 • आपत्कालीन क्रमांक ०२२-२३६२९४१०
 • संदीप सिंग, अधिकारी ९९५८८९९५०१
 • उत्पल दत्ता, अधिकारी ९९५८७९३०१२
 • प्रकल्प व्यवस्थापक किम जॅन्ग यॉन्ग ७०४५९०१३६६
 • निवासी अभियंता विजय जंगम ७०८५४९३६३८

If there is water in this part of Mumbai report it read detail story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If there is water in this part of Mumbai report it read detail story