esakal | मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, आज असा असेल पावसाचा जोर 
sakal

बोलून बातमी शोधा

rain

शनिवारी दुपारपासून पावसानं अक्षरशः थैमान घातलं. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, आज असा असेल पावसाचा जोर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई, ठाण्यासह उपनगरात शनिवारी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला.  शनिवारी दुपारपासून पावसानं अक्षरशः थैमान घातलं. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.  मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

मोठी बातमी हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

शनिवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत सांताक्रूझमध्ये 132.2 मिमी तर कुलाबा येथे 74.6 मिमी पावसाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, रविवारी मुंबईत अधूनमधून मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज आहे. तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. महापालिकेच्या नोंदीनुसार पश्चिम उपनगरांमध्ये शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये अधिक पाऊस होता. शहरांमध्ये सायंकाळी 6 पर्यंत 81.91, पूर्व उपनगरांमध्ये 82.69 तर पश्चिम उपनगरांमध्ये 88.67 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी शनिवारी संध्याकाळी 7.30 पर्यंतच्या 24 तासांमध्ये 200 मिमी अर्थात 20 सेंटीमीटरहून अधिक पाऊस झाला.

महत्वाची बातमी : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण-भिवंडी परिसरात रात्रभर पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.  उत्तर कोकणात रेड अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसाचा जोर येत्या 24 तासात कायम राहिल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.  लोअर परेल, दादर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मुलुंड, भांडुप या ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळत आहे.

हे ही वाचामराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...

मुंबईत मुसळधार पावसामुळे हिंदमाता, मिलन सबवे, किंग्ज सर्कल, कुर्ला, एस.व्ही. रोड,  वडाळ्याचा पंचायत रोड, धारावी क्रॉस रोड, काळाचौकीतील सरदार हॉटेल परिसर, माटुंग्याला एसआयईएस कॉलेज, भायखळा पोलिस ठाणे, चेंबूर पुलाखाली, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सबवे, वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळ या भागात  पाणी साचले होते. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. बोरिवली अग्निशमन दल, दौलत नगर, कांदिवली अग्निशमन दल केंद्र येथे तसंच ठाण्यात काही ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. विक्रोळी, विलेपार्ले, वडाळा, मुलुंड, मालवणी, गवाणपाडा, दिंडोशी, धारावी येथे 100 मिमीहून अधिक पाऊस झाला. ठाणे नौपाडा येथे 222.6 मिमी इतका सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. 

नक्की वाचालॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

कोकण किनारपट्टीवर 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला  आहे.

heavy rainfall in all over mumbai rain is also coming today

loading image