मुंबईत लस टंचाई आहे, मग धंदा कसा सुरु झाला? संजय निरुपम

BMC केंद्रावर दिवसाला फक्त १०० लसी मग खासगी हॉस्पिटल्समध्ये दिवसाला हजार लसींचे डोस कसे मिळतात?
 sanjay nirupam
sanjay nirupam

मुंबई: "मुंबईत लसीकरणाच्या (Mumbai vaccination) नावावर धंदा सुरु झाला आहे. बाजाराची एक जुनी वाईट पद्धत आहे. आधी कुठल्याही वस्तुची टंचाई निर्माण करा. लोकांमध्ये हाहाकार निर्माण करा, गोंधळ होऊं दे, त्यानंतर चढ्या दराने मोठ्या किंमतीला मालाचा पुरवठा करायचा. लसीच्या बाबतीतही (vaccine shortage in mumbai) सध्या हेच सुरु आहे" अशी टीका माजी खासदार आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. (If vaccine shortage in mumbai then how this business is started sanjay nirupam)

"केंद्राला लस १५० रुपयाला, राज्याला २५० रुपयांना आणि खासगी हॉस्पिटल्सना ४०० रुपयांना लस विकली जात आहे. आज खासगी हॉस्पिटल मुंबईतील वेगवेगळे गृहनिर्माण सोसायटयांबरोबर डील करत आहेत. लोकप्रतिनिधीही डील करतायत. १२०० रुपयांना लस विकली जात आहे. काही आमदारांनी लसीकरणाचं काम सुरु केलं आहे. सामान्य नागरिकांकडून १ हजार रुपये वसूल केले जात आहेत" अशी टीका निरुपम यांनी केली.https://twitter.com/sanjaynirupam/status/1398150494950879233

 sanjay nirupam
BLOG: ठाकरे सरकार 'बंदबुद्धी'तून बाहेर पडणार?

"मुंबईतील वेगवेगळया वॉर्डात लसीकरण केंद्र सुरु आहेत. त्या लसीकरण केंद्रांना दिवसाला १०० पेक्षा जास्त लसी टोचू नये, असे बीएमसीने निर्देश दिले आहेत. लस टंचाईचं कारण दिलं जात आहे. बीएमसी सेंटरवर मोफत लसीकरण होतं, तिथे १०० पेक्षा जास्त लसी उपलब्ध नाहीत. मग खासगी हॉस्पिटल्सना १ हजार लसी कशा मिळतात? हा प्रस्ताव कुठून आला?" असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला.

 sanjay nirupam
'नियोजन शून्य बेशरम खंडणी सरकार जनतेला सांगतंय..."

"गरीब लोकांना लसीसाठी वाट पाहावी लागेल, सडावं लागेल. श्रीमंत लोक, त्यांना परवडू शकतं म्हणून जेव्हा हवं तेव्हा लस घेऊ शकतात. लसीच्या नावावर घाणेरडा धंदा मुंबईत जोरात सुरु आहे. खासगी हॉस्पिटल्सना कमवायचे असले, तरी त्यांनी २५० रुपयाच्या, ४०० रुपयाच्या लसींना १२०० रुपये किंमत लावू शकत नाही ही लूट आहे" असा आरोप निरुपम यांनी केला. "लसी सर्वांना मोफत मिळाल्या पाहिजेत. आज लोकांना लसींसाठी १ हजार रुपये द्यायला भाग पाडलं जातयं. बीएमसी आणि महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यावं" अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com