उल्हारनगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जलपर्णी देण्याचा मनसेचा इशारा 

download.jpg
download.jpg

उल्हासनगर : उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णीचा विळखा बसल्याने या नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या उल्हासनगरसह इतर शहरातील 45 लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट जलपर्णी देऊन पालिकेच्या खळ-खट्याक करण्याची तयारी मनसेने केली आहे.

एकीकडे खेमानी नाल्याचे व म्हारळच्या परिसरात उभारण्यात आलेल्या टोलेजंग इमारतींचे सांडपाणी उल्हास नदीत सोडले जात आहे तर, दुसरीकडे नदीचे पात्रच जलपर्णीच्या विळख्यात सापडले आहे. मात्र, पालिका प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने प्रथम खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त अच्युत हांगे, गोविंद बोडके यांच्यासोबत जलपर्णीची व नाल्याची पाहणी करून त्यांना सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे 45 लाख नागरिकांच्या आरोग्याशी निगडित ही जलपर्णीची समस्या असल्याने त्यात आता मनसेनेही उडी घेतली आहे. अलीकडेच ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे पदाधिकारी मंदार हळबे, प्रदिप गोडसे, बंडू देशमुख, मनोज शेलार आदींच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांना जलपर्णी बाबत इशारा देण्यात आलेला आहे. त्यानंतर 22 फेब्रुवारीला
मनसे नेते राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाध्यक्ष प्रदिप गोडसे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, तालुका अध्यक्ष अश्विन भोईर, मनविसेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार शहर उपाध्यक्ष सचिन बेंडके, सुभाष हटकर, शहर संघटक मैनुऊद्दीन शेख दिनेश आहुजा उपतालुका अध्यक्ष विवेक गंभिरराव शहर सह सचिव प्रविण माळवे, सागर चौहाण, सुहास बनसोडे,प्रमोद पालकर, जाफर शेख,विक्की जिप्सन, गणेश आठवले ,अशोक गरड, प्रकाश कारंडे, मुकेश चव्हाण ,विजय पवार, उत्कर्ष पाटील, संदिप लांडे ,किशोर रणदिवे यांच्या सह असंख्य आदींनी मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांना निवेदन देऊन जलपर्णीवरून खळ-खट्याकचा इशारा दिला आहे. आयुक्त अच्युत हांगे यांना देण्यासाठी मनसेने सोबत जलपर्णी आणली होती. मात्र हांगे नसल्याने जलपर्णीचा प्लॅन फसला असे बोलले जात आहे.

दरम्यान आम्ही दिलेल्या निवेदनातील इशाऱ्यानुसार जलपर्णीची विल्हेवाट लावली नाही तर अधिकाऱ्यांना जलपर्णी देण्यात येणार अशी माहिती बंडू देशमुख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com