तर कोणत्याही संकटावर निश्चितच मात करणं शक्य- मुख्यमंत्री

तर कोणत्याही संकटावर निश्चितच मात करणं शक्य- मुख्यमंत्री मुंबईत पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण If Whole State will Fight Together against any odd then we will surely Succeed Says CM Uddhav Thackeray
cm uddhav thackeray
cm uddhav thackeray file photo

मुंबईत पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई: कोरोनाच्या (Corona) संकटावर मात करताना ऑक्सीजनबाबत (Medical Oxygen) आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने मुंबईत विविध कंपन्यांच्या सीएसआर (CSR) फंडातून पाच रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण झाले. अशा पद्धतीने सर्वजण एकत्र आलो, तर आपण कोणत्याही संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. (If Whole State will Fight Together against any odd then we will surely Succeed Says CM Uddhav Thackeray)

cm uddhav thackeray
उल्हासनगरमध्ये विनामास्क दिसल्यास थेट होणार कोविड चाचणी

मुख्यमंत्री म्हणाले, "मुंबई आणि लाटांचा कायमचा संबंध आहे. एक लाट गेली की दुसऱ्याची तयारी करावी लागते. कोरोना काळातही सर्वांनीच युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम केले. कोरोना काळात मुंबई मॉडेलचे जगभर कौतुक झाले. पण हे श्रेय माझे नसून प्रत्यक्ष काम करणाऱ्या आपल्या सर्वांचे आहे अशा शब्दात त्यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले. मुंबईत अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद आहे."

cm uddhav thackeray
राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार!
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeraysakal

"ऑक्सिजन अभावी मुंबईतील सुमारे १५० रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्या सुमारास राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने आज नवीन पाच संयंत्रे सुरू झाली आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करणारे मंत्री आदित्य ठाकरे, संबंधित सर्व यंत्रणांसह सीएसआर निधीतून मदत केलेल्या कंपन्यांचेही आभार मानले. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याऐवजी आपले काम बोलले पाहिजे", असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

cm uddhav thackeray
खळबळजनक! मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा

ऑक्सिजन व्यवस्थापनाचे यश

काही दिवसांपूर्वी मुंबईत सुमारे ११ हजार रूग्ण होते, परंतु ऑक्सिजनच्या योग्य व्यवस्थापनामुळे सुदैवाने कोणीही दगावले नाही, याचे श्रेय महापालिकेची यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणेला दिले. त्याचबरोबर ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होताना सीएसआर निधीतून मदत देण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तात्काळ पुढे येऊन मुंबईतील पाच आणि अन्य दोन अशा सात ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारल्याबद्दल कंपन्यांचे आभार.

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

cm uddhav thackeray
बोगस लसीकरणानंतर मुंबई महापालिकेने बनवली नियमावली

यावेळी, मुंबईतील रुग्णालयांना चांगली रुग्णसेवा करून दिलासा देता येईल असा विश्वास महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला. तर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षमपणे तयार असल्याचे यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com