आयआयटी मुंबईत मांसाहारासाठी वेगळे ताट घेण्याचा फतवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई : आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 12जानेवारीला हॉस्टेलच्या खानावळीकडून एक ईमेल आला आहे. यामध्ये मांसाहार करावयाचा असल्यास वेगळ्या ताटांचा वापर करण्याचा चमत्कारीक आदेश देण्यात आला आहे. याप्रकारामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

मांसाहारी भोजनासाठी वेगळी ताटे वापरण्याची विनंती यामध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आली असून, यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही मुलांच्या तक्रारीनंतर हा नियम केला असल्याचे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या ईमेल विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. आता मांसाहार करणाऱ्यांनी श्वास घेणे देखील बंद करावे का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

Web Title: IIT Bombay asks Non-Vegetarian Students to Eat in Separate Plates