IIT बॉम्बे यंदा पावसाळ्यात करणार खास काम, मुंबईकरांना मिळणार मोठा फायदा

यासाठी पहिल्या टप्प्यात संपूर्ण शहरातून डेटा गोळा करण्याची योजना आहे.
IIT Bombay
IIT Bombay sakal mumbai
Updated on

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे म्हणजेच IIT बॉम्बेने (IIT Bombay) यंदाच्या वर्षी पावसाळ्यात मुंबईकरांसाठी मोठं काम करणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात आयआयटी बॉम्बेमधील हवामान विभागाशी संबंधित विद्यार्थांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी रीअल-टाइम फ्लड (Flood Map) नकाशे तयार करण्याची योजना आखली आहे. (IIT Bombay Work On Mumbai Flood)

IIT Bombay
भरती वेळी पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज; महापौरांची ग्वाही

याबाबत मंगळवारी @ClimatelTB या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईकरांना #mumbaiflooddata आणि #mumbaiflood चा वापर करून यंदाच्या पावसाळ्यात त्यांच्या भागातील पुराची छायाचित्रे ट्वीट करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक भागात ठराविक प्रमाणात पाऊस झाल्यास कसा पूर येण्याची शक्यता आहे हे मुंबईकरांना समजावे, तसेच ही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध असावा यासाठी अशा प्रकारचे मॉडेल तयार करण्याची अंतिम योजना असल्याचा उल्लेख ट्वीटमध्ये करण्यात आला आहे.

IIT Bombay
मुंबईची 'तुंबई' यंदाही अटळ?; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणतात...

फोटो ट्वीट करण्याचे आवाहन

हवामान विभागाशी संबंधित आंतरविद्याशाखीय कार्यक्रमाचे समन्वयक सुबिमल घोष यांनी सांगितले की, @ClimatelITB विद्यार्थ्यांना क्राउडसोर्सिंगद्वारे मुंबईतील पुराचे निरीक्षण करायचे आहे आणि ते सर्वांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी या पावसाळ्यात आणि येत्या पावसाळ्यात आम्हाला मदत करा असे आवाहनही घोष यांनी केले आहे जेव्हा पूर पातळी उपलब्ध नसते तेव्हा आम्ही एकत्रितपणे पुराचे निरीक्षण करू शकतो असे ते म्हणाले.

IIT Bombay
दोन रुपयांत मिळणार एक लिटर शुद्ध पाणी, IIT कानपूरने बनवले उपकरण

सर्व डेटा एका वेब पोर्टलवर उपलब्ध असेल

घोष म्हणाले की, या सर्व योजनेसाठी एक स्वयंचलित प्रणाली तयार करण्यासाठी सांख्यिकीय मॉडेल वापरण्याची आमची योजना आहे. जिथे मुंबईकरांना विशिष्ट पावसामुळे किती पुराची काय स्थिती आहे याची माहिती दिली जाऊ शकते. यासाठी पहिल्या टप्प्यात संपूर्ण शहरातून डेटा गोळा करण्याची योजना असून, पूर नकाशे विशेषत: या उद्देशासाठी तयार केलेल्या वेब पोर्टलवर उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com