IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

wall mounted fans IIT Bombay: विद्यार्थ्यांच्या नुकत्याच घडलेल्या घटनेशी याचा थेट संबंध नसून, ही वसतिगृहांच्या पूर्वनियोजित नूतनीकरण प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे आयआयटी मुंबई प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 IIT Bombay

IIT Bombay

esakal

Updated on

Safety Measure or Renovation: आयआयटी मुंबईच्या वसतिगृहातील खोल्यांमधून छतावरील पंखे काढून त्याजागी भिंतीवरील पंखे बसवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. यासाठी नवीन पंख्यांची पहिली खेप कॅम्पसमध्ये दाखल झाली आहे. १८ सप्टेंबर रोजी बी.टेक दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या २० वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील छताच्या पंख्याला गळफास लावून जीव दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com