IIT Mumbai: आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात,न्यायलयाकडून आरोपी अरमान शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दर्शन सोलांकीच्या मृत्यूचा तपास करणार्‍या मुंबई पोलीसांच्या एसआयटी टीमला दर्शनची 'सुसाईड नोट' सापडल्यानंतर अरमान खत्रीला अटक करण्यात आली होती. या सुसाईड नोटमध्ये दर्शन सोलंकीच्या मृत्युसाठी अरमान कारण असल्याचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार , पोलिसांनी केलेल्या तपासात दर्शन सोलंकीने अरमान खत्रीशी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
 IIT Mumbai
IIT Mumbaisakal

मुंबई- मुंबईतील विशेष न्यायालयाने शनिवारी आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी अरमान खत्री याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांकडून अरमानची पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली. अरमान खत्रीला त्याच्या सोबतचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दर्शन सोलांकीच्या मृत्यूचा तपास करणार्‍या मुंबई पोलीसांच्या एसआयटी टीमला दर्शनची 'सुसाईड नोट' सापडल्यानंतर अरमान खत्रीला अटक करण्यात आली होती. या सुसाईड नोटमध्ये दर्शन सोलंकीच्या मृत्युसाठी अरमान कारण असल्याचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार , पोलिसांनी केलेल्या तपासात दर्शन सोलंकीने अरमान खत्रीशी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

 IIT Mumbai
Mumbai Metro Carshed: मेट्रो कारशेडच्या कामात मोठा घोटाळा! आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

या बाबत दर्शनने अरमान खत्रीची वारंवार माफी मागितली होती परंतु नंतर त्याला पेपर कटरने अरमानने धमकावले होते.इतर विद्यार्थ्यांनी दर्शन सोलंकी याला धीर देण्याचा आणि वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असल्याचा पोलिसांना तपासादरम्यान लक्षात आले.

कुटुंबाची मागणी

दरम्यान, मृत दर्शनचे वडील रमेश भाई सोलंकी यांनी बुधवारी एसआयटीचे प्रमुख असलेले सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात जातीय वादाच्या मुद्द्याकडे तपासात दुर्लक्ष करू नये अशी मागणी केली आहे. अलीकडेच दर्शन सोलंकीच्या बहिणीला दर्शनच्या सोशल मीडिया खात्यावर त्याच्या काही चॅट्स सापडल्या आहे.

या चॅट्मध्ये ‘सॅम राजपूत’ नावाच्या एका अकाऊंटशी संभाषण झाले होतें. या संभाषणात दर्शनला त्याने एक प्रश्न विचारला होता.

या संभाषणात दर्शनची जात उघड झाली. बहिणीच्या म्हणण्यानुसार, सोलंकी चॅटमध्ये पुढे म्हणाला की “आता सॅमलाही त्याची जात माहीत असल्याने तो त्याचाशी वर्तन व्यवस्थित करणार नाही. सोळंकी कुटुंबियानी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे या दृष्टिकोनातूनही तपास करण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com