कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे

कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने वुहानला मागे सोडले, तर महाराष्ट्र चीनच्याही पुढे

मुंबई :  कोरोना बाधितांच्या संख्येत मुंबईने चीनच्या वुहान शहराला मागे टाकले आहे. कोरोना संसर्गाला चीनच्या वुहानमधूनचं सुरुवात झाली होती. या शहरातूनचं जगभरात कोरोना पसरला. मंगळवारी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येने 50 हजाराचा टप्पा पार केला. मुंबईत आजच्या घडीला 50,878 रुग्ण आहेत. तर वुहानमध्ये कोरोना बाधितांची संख्या 50,333 एवढी होती. दूसरिकडे एकुण रुग्णसंख्येची तुलना करता, महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.  मुंबईसह महाराष्ट्राने 90 हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे. मंगऴवारी राज्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या  90,787 होती. तर चीनमध्ये 89,681 एवढे कोरोना बाधित रुग्ण होते.  राज्यात  44,860 अक्टीव रुग्ण आहेत. तर 42,638 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 3,289 लोकांचा मृत्यु झाला आहे. 

ग्रेट ब्रिटेनला मागे टाकून चौथा क्रमांक गाठणार 
देशात गेल्या सहा दिवसापासून दररोज 10 हजाराच्या आसपास नवे कोरोना  बाधित सापडल आहेत. जगात झपाट्याने वाढ होणाऱ्या देशामध्ये  ब्राझीलवनंतर भारताचा नंबर लागतो. त्यामुळे लवकरचं रुग्णसंख्येत ग्रेट ब्रिटेनला मागे टाकून भारताचा चौथ्या क्रमांकावर झेप घेईल, अस चित्र आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत कोरोनामुळे होणाऱ्या

मृत्युचे प्रमाण भारतात खूप कमी आहे.
जगभरात 72 लाख लोकांना संसर्गकोरोनामुळे 4,10,900 लोक दगावले आहेत. एकट्या अमेरिकेत 1 लाख 12 हजारापेक्षा अधिक मृत्यु झाले आहेत. तर ग्रेट ब्रिटेनमध्ये 40,883 तर ब्राझीलमध्ये 38,406 रुग्ण आतापर्यत कोरोनामुळे दगावले आहेत. जगातील 190 देशांमध्ये 72 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मोठी बातमी - अरे वाह! मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत 'अशी' झाली घट

जगातिल टॉप 6 कोरोना बाधित देश

1.अमेरिका
कोरोनाबाधितांची संख्या-  19,00,087 
मृत्यु- 1,12,173 

2. ब्राझील 
कोरोनाबाधितांची संख्या – 7,39,503
मृत्यु-  38,406

3. रशिया 
कोरोनाबाधितांची संख्या - 4,84,630
मृत्यु- 6,134

4. ग्रेट ब्रिटेन
कोरोनाबाधितांची संख्या - 2,89,140
मृत्यु – 40,883

5. भारत 
कोरोनाबाधितांची संख्या - 2,76,538 
मृत्यु- 7,745

6. स्पेन 
कोरोनाबाधितांची संख्या - 2,41,966
मृत्यु- 27,136

mumbai crosses wuhans covid19 patient count maharashtras count is more than china

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com