कृत्रिम केसांच्या आड लपवली 'हेरॉईन'; कुरिअरच्या माध्यमातून तस्करीचा पर्दाफाश

कृत्रिम केसांच्या आड लपवली 'हेरॉईन'; कुरिअरच्या माध्यमातून तस्करीचा पर्दाफाश


मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी कुरिअर पार्सलच्या माध्यमातून देशात तस्करी करून आणलेला एककिलो हेरॉईन जप्त केले आहे. टांझानियाच्या दार एस सलाम येथून हा माल भारतात आला होता. मेकअपसाठी वापरल्या जाणार्‍या कृत्रिम केसांच्या पॅकेटमध्ये हे ड्रग्स लपवले होते.

कुरियर पार्सलच्या माध्यमातून टांझानियाच्या दार एस सलाम येथून नवी मुंबई येथे ड्रग्स आणली जाणार असल्याची  विश्वसनीय माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी मुंबईत आलेल्या एका पार्सलच्या तपासणीत  कृत्रिम केसांच्या पॅकेटमध्ये काही तपकिरी रंगाची पावडर हुशारीने लपवून ठेवली गेली होती.
फील्ड टेस्ट किटवर पावडरची तपासणी केली असता ती पावडर हेरॉईन असल्याचे निदर्शनास आले. पुढे तपासणी केली असता जवळपास एक किलो सात ग्राम  हेरॉईन सापडली आणि त्यानंतर ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) अ‍ॅक्ट,  अंतर्गत डीआरआयने ती जप्त केली.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्सची  किंमत 3 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.डीआरआय याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक देशांनी विमान प्रवासावर बंदी घातली आहे. अनेक देशांमध्ये तुरळक प्रमाणात विमान वाहतुक सुरू आहे, तर काही देशांमध्ये अद्याप विमान वाहतुक पूर्वपदावर आलेली नाही. त्याचा फटका ड्रग्स तस्करांवर पडला असून त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तस्करीतील ड्रग्सचा साठा वाढवला आहे. त्याशिवाय त्यांच्या मोड्स ऑपरेंडीमध्येही बदल झालेला आहे. यापूर्वी आफ्रीकी व दक्षिण अमेरिकन देशातील नागरीकांचा तस्करीसाठी वापर केला जायचा. आता मालावियन,  गिनी प्रजासत्ताक यासारख्या देशांतील नागरीकांचा वापर केला जात आहे. तसेच कुरियरसेवा, कार्गोचाही मोठाप्रमाणात वापर करण्यात येत आहे. यावेळी या तोटा भरून काढण्यासाठी एकावेळी पाठवण्यात येणा-या ड्रग्सच्या साठ्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्याभरात चार कारवायांमध्येच डीआरआयने 24 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.

illegal chemical found in courier service in mumbai 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com