
- कोरोना टेस्टसाठी 4 हजारांची वसुली सुरूच
- शासकीय आदेशाला केराची टोपली
आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली! खासगी रुग्णालयांची लुटमार सुरूच
मुंबई : महाराष्ट्र शासनाने कोरोना चाचणीचे दर निश्चित केले असतानाही आजही नागरिकांची लूट होत आहे. कोरोना चाचणीसाठी काही खासगी लॅब कडून तब्बल 4000 शुल्क आकारले जात आहे.बेकायदेशीर शुल्क आकारुनही काही लॅब मध्ये कोरोना चाचणी केली जात नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...
लालबाग मधील लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटीबेल ट्रस्ट मध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या ट्रस्टविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे. कोरोना टेस्ट करण्यासाठी गेलेल्या एका रुग्णाकडून टेस्टसाठी 4 हजार रुपये उकळले. इतकेच नाही तर 4 हजार रुपये शुल्क उकळल्या नंतरही त्या रुग्णाची कोरोना टेस्ट केली नसल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.
कोरोना रुग्णांची लूट सुरू असल्याचा प्रकार कळताच गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता आणि प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, महाराष्ट्र शासनाने कोरोना चाचणीचे दर निश्चित केले असतानाही नागरिकांची लूट सुरुच आहे. लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटीबेल ट्रस्टने शासकीय निर्णयाचा विरोधात जात शुल्क 4000 रुपये आकारले आहेत. विशेष म्हणजे 4000 हजार शुल्क आकारूनही चाचणी केली नाही त्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच..
अश्या संस्थांवर कार्यवाही केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि लूट करणारे संस्था, खाजगी लॅब यांच्यावर वचक बसेल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
खासगी कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅब चे दर शासनाने निश्चित केले आहेत. रूग्णालयातून स्वाब घेतल्यास 2,200,तर रुग्णाच्या घरी येऊन स्वाब घेतल्यास 2,500 रुपये दर निश्चित केले होते. मात्र चाचणीसाठी थेट लॅब मध्ये जाणाऱ्या रुग्णाकडून 2,800 रुपये उकळले जात होते. यासाठी पीपीई किट किंवा वाहतूक खर्च येत नसल्याने शासनाने त्याचा मध्य म्हणून 2,500 रुपये दर निश्चित केला आहे. असे असून ही काही खासगी लॅब कडून बेकायदेशीररित्या 4 हजार रुपये उकळले जात आहेत.