क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...

आपलं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट नीट पाहा. अनेकदा कंपन्यांकडून काही सुविधा दिलेल्या असतात. या सुविधांचे पैसे आपोआप तुमच्या क्रेडिट कार्डातून कापले जात असतात.

क्रेडिट कार्डच्या विळख्यात अडकले आहात ? अशी करा क्रेडिट कार्डच्या विख्यातून स्वतःची सुटका...

मुंबई - क्रेडिट कार्ड, एक अशी गोष्टी जी आपल्याकडे असावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र स्वतःवर नियंत्र न राहिल्यास त्याचा त्रासही आपल्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. एकादी वस्तू घायची असेल तर पटकन क्रेडिट कार्ड वापरायचं आणि आपण घेतलेल्या वस्तूची रक्कम Easy EMI मध्ये कन्व्हर्ट करायची. अशाने आपण मोठी रक्कम सुलभ पद्धतीने बँकेला अदा करू शकतो. अनेकदा फक्त स्टेटस सिम्बॉल म्हणून अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात आणि त्याच्या विळख्यात अडकत जातात. 

अशात एकाचवेळी अनेक गोष्टी घेतल्यात की हा कर्जाचा डोंगर हळू हळू मोठा होत जातो. एकदाका हा EMI चा डोंगर मोठा झाला आणि आपल्याला पैसे भरण्यास अडचण सुरु होते. EMI भरले नाहीत तर आपला सिबिल रेकॉर्ड तर खराब होतोच शिवाय चक्रवाढ पद्धतीने EMI वरील व्याज वाढत जातं. बरं आपण फक्त मिनिमम रक्कम भारत राहतो आणि क्रेडिट कार्डच्या चक्रात नकळत अडकत जातो. अगदीच गरज असल्यास क्रेडिट कार्ड वापरावं असं अर्थतज्ज्ञ सल्ला देतात. मात्र अटीतटीच्या वेळी क्रेडिट कार्ड हे आपल्यासाठी नकीच सोईचं असतं.

अखेर! अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत निर्णय झाला; जाणून घ्या सविस्तर

अशा पद्धतीने स्वतःला क्रेडिटकार्डच्या चक्रातून बाहेर काढा :  

  • जोपर्यंत आपल्या क्रेडिट कार्डवरील संपूर्ण रक्कम शून्य होत नाही तोवर आपले क्रेडिट कार्ड्स आपले आई वडील किंवा नवरा किंवा बायोकोकडे देऊन ठेवा. "मी कितीही कार्ड मागितलं तरीही मला ते देऊ नका", असं त्यांना सांगून ठेवा. त्यामुळे तुमचा दर महिन्याला त्या कार्ड्सवरून होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल. 
  • आपलं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट नीट पाहा. अनेकदा कंपन्यांकडून काही सुविधा दिलेल्या असतात. या सुविधांचे पैसे आपोआप तुमच्या क्रेडिट कार्डातून कापले जात असतात. अनेकदा तुमचे मोबाईल बिल, किंवा TV किंवा विजेचं बिल हे क्रेडिट कार्डला लिंक केलेलं असतं. यासगळ्या गोष्टी डी-लिंक करा.      
  • क्रेडिट कार्ड कंपनीकडून मिळणाऱ्या पॉइंट्सला भुलू नका. कारण याच पॉइंट्सच्या नादात आपण अधिक खर्च करत असतो. या मोहापासून स्वतःला दूर ठेवा. तुमची दैनंदिन बिलं ही तुमच्या डेबिट कार्डमधून भरणं योग्य राहील.     
  • अनेकदा कंपनीकडून काही छुपे चार्जेसही आकारले जातात. तुमच्या परवानगीशिवाय असे चार्जेस लावले असतील तर त्वरित तुमच्या क्रेडिट कार्ड बँकेशी संपर्क साधा आणि याबद्दल माहिती घ्या. आणि तात्काळ हे चार्जेस तुमच्या बिळातून कमी करायला सांगा  

BIG NEWS चीनला आणखी एक मोठा दणका, मुंबईतील हे 'मोठं' कंत्राटही गेलं हातातून... 

  • एखादी वस्तू आपण क्रेडिट कार्डावरून घेतल्यास त्याच्या देय तारखेआधी ३ दिवस तुमची डे रक्कम पूर्ण भरून टाका. अनेकदा बिल आल्यानंतर त्याचं मिनिमम पेमेंट केलं जातं. तसं करू नका. कारण मिनिमम पैसे भरल्यास अनेकदा मुद्दल ही तशीच राहते आणि तुम्ही फक्त व्याज भरत राहतात. त्यामुळे तुम्ही एखादी वस्तू घेतल्यास त्याचे पूर्ण पैसे भरून टाका.    
  • तुम्ही चक्रवाढ व्याजाच्या चक्रात अडकलात तर थकीत रक्कम एकरकमी कशी भरू शकतो यावर विचार करा. आपल्या घरातूनच आई बाबा किंवा भावा-बहिणीकडून आपल्या थकबाकीचे पैसे उधार मिळत असतील तर ते घेऊन क्रेडिट कार्डाची थकबाकी भरून टाका आणि या चक्रातून स्वतःला बाहेर काढा. हे उधार पैसे तुम्ही शून्य व्याजासह आपल्या फॅमिली मेम्बरला EMI स्वरूपात देऊ शकतात. 
  • कुणाकडून पैसे मिळत नसतील तर कमी व्याजाचं  पर्सनल लोन मिळत असले तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. कारण क्रेडिट कार्डाच्या व्याजदरापेक्षा पर्सनल लोनचा व्याजदर कमी असतो. याचा फायदा म्हणजे तुमची चक्रवाढ व्याजाच्या विळख्यातून सुटका होईल आणि तुम्हाला जरा तरी रिलीफ मिळेल. मात्र यात महत्त्वाची बाबा म्हणजे हे लोन बिलं भरून टाकण्यासाठीचं वापरा. 

BIG NEWS तेजस ठाकरे आणि टीमने शोधली पालींची नवीन प्रजाती, नाव आहे...

  • यामधून बाहेर निघण्याचा सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे तुमच्या थकबाकीची स्टेटलमेंट करणं. हा पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकतात. कठीण परिस्थितीमुळे तुमची नोकरी गेली, किंवा काही आपत्ती आली तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड बँकेला लोन सेटलमेंट कारवायास सांगू शकतात. यामध्ये तुमच्या एकूण थकबाकीच्या बँक ही तुम्हाला सूट देते. मात्र यानंतर तुमचं कार्ड बंद होतं आणि शेवटी भरणार असलेली रक्कम तुम्हाला एकरकमी भरावी लागते. याशिवाय तुम्हाला पुढे कोणतंही लोन मिळणं किंवा क्रेडिट कार्ड मिळणं कठीण होतं किंबवाना कोणतंही कर्ज मिळत नाही . त्यामुळे हा सर्वात शेवटचा पर्याय म्हणून याकडे पाहा. 

how to get rid of your credit cards and huge outstanding read important tips

टॅग्स :BankIndia