बेकायदा पार्किंग भोवले... महिनाभरात ६७ लाखांची दंडवसुली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

बेकायदा पार्किंग करणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत महिनाभरात ६७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला...

मुंबई : बेकायदा पार्किंग करणाऱ्यांना चाप बसावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत महिनाभरात ६७ लाख ६५ हजार ५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण १०४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली. 

वाहनतळालगतच्या एक किलोमीटर परिसरात बेकायदा पार्किंग केल्यास वाहनचालकाकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, सर्वच नगरसेवकांनी त्याला विरोध करीत एक किलोमीटरऐवजी अंतर कमी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने एक किलोमीटरचे अंतर अर्ध्यावर आणले आहे. ७ जुलैपासून कारवाई सुरू झाली आहे. पालिकेच्या वाहनतळांपैकी २६ ठिकाणी कारवाई सुरू आहे. सुरुवातीच्या तीन दिवसांतच २४३ वाहनांवर कारवाई होऊन आठ लाख ६९ हजार ८०० एवढी दंडवसुली करण्यात आली.
जप्त वाहन वेळेत सोडवून न नेल्यास विलंब शुल्कही आकारण्यात येत आहे. महिनाभर दुर्लक्ष केल्यास त्या वाहनाचा जाहीर लिलाव करण्याचीही तरतूद आहे. 

       वाहनांची वर्गवारी

  • चारचाकी ः ६८४
  • तीनचाकी ः २४
  • दुचाकी ः ३३३
  1. मुंबईत एकूण वाहनतळ : १४६
  2. वाहनांची क्षमता : ३४ हजार ८०८

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal parking drivers get a fine of Rs 2 lakh a month in Mumbai