'श्रमिक स्पेशल'च्या नावावर दलालांकडून अवैध वसूली; समाजमाध्यमांवर ऑडियो रेकॉर्डिंग व्हायरल

'श्रमिक स्पेशल'च्या नावावर दलालांकडून अवैध वसूली; समाजमाध्यमांवर ऑडियो रेकॉर्डिंग व्हायरल
Updated on

मुंबई : श्रमिक स्पेशल रेल्वेमध्ये जाणाऱ्या परप्रांतीय श्रमिकांकडून नावनोंदणीच्या नावाने प्रत्येकी एक हजार रूपयांची अवैध वसूली केली जात असल्याची ऑडियो रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यासाठी अनेक दलाल सक्रीय झाले असून, राज्य सरकारच्या माध्यमातून या श्रमिकांची नोंदणी केली जात असताना अडचणीच्या काळात श्रमिकांकडून अवैध वसूली कोण करत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने 1 मे पासून श्रमिक स्पेशल रेल्वे सोडल्या आहे. सुमारे 5 लाख श्रमिकांना आतापर्यंत त्यांच्या राज्यात पोहचवण्यात आले आहे. मात्र, मुंबई उपनगरांमध्ये आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये लाखो परप्रांतीय मजुर अद्यापही घरी जाण्याच्या प्रतिक्षेत आहे. श्रमिक रेल्वेसाठी नोंदणी कुठे करायची, हे समजत नसल्याने अशा श्रमिकांचा दलालांकडून फायदा घेत आहे. नावनोंदणी करून देतो असे सांगून श्रमिकांकडून आर्थिक फसवणूक करत आहे. 

दलालांकडून होणाऱ्या या वसूलीशी रेल्वेचा काहीही संबंध नाही. राज्य सरकारकडून जेवढे प्रवासी आहे, तेवढेच पैसे घेऊन राज्य सरकारच्या अधिकृत अधिकाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून तिकीट दिल्या जाते. त्यामुळे दलालांकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांबाबत रेल्वेचा काही संबंध येत नाही.
- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com