
petition filed on Illegal recruitment
ESakal
डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची नोकर भरती बेकायदेशीरपणे करण्यात आली असून यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप माजी संचालक मयूर पाटील यांनी केला आहे. नोकर भरती करताना फक्त बाजार समितीमधील आजी माजी संचालक आणि अधिकारी वर्गाच्या नातेवाईकांना भरती करुन घेतले आहे असे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या बुधवारी 24 सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.