
मुंबई, ता. 30 : प्रतिबंधीत वन्यजीवांची विक्री करणाऱ्या दोघा आरोपींची धरपकड करण्यात आली. मालाड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून या आरोपींकडून स्टार प्रजातीचे चार जिवंत कासव जप्त करण्यात आले.
उपवनसंरक्षक, वन्यजीव ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, फणसाड अभयारण्य यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव मुंबई यांचे कडील अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रिय उपनिदेशक वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो (पश्चिम क्षेत्र) यांचे कडील अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रितपणे सापळा लावून अंधेरी (पूर्व) मुंबई येथून आरोपी क्र. 01 शेख मोहम्मद दानिश अब्दुल रहीम वय - 25 वर्ष राहणार - मालाड आणि आरोपी क्र. 02 मोहम्मद नदीम जमील अहमद वय - 23 वर्ष राहणार - मालाड, मुंबई यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसूची क्र. I मधील भाग II मध्ये समाविष्ट असलेला इंडियन सॉफ्ट शेल 01 जिवंत व अनुसूची क्र. IV मधील समाविष्ट स्टार प्रजातीचे कासव 04 जिवंत या वन्यजीवांची अवैधरित्या विक्री करतांना पकडण्यात आले.
सदर वन्यजीव जवळ बाळगणे, अवैधरित्या विक्रीसाठी ठेवणे हे अधिनियम अन्वये प्रतिबंधित आहे.सध्या वरील वन्यजीव हे प्लांट एण्ड अॅनिमल वेलफेअर सोसायटी - मुंबई (पॉज-मुंबई) यांच्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी तसेच पुढील देखरेखीखाली सोपविण्यात आले.
सदर वन्यजीव गुन्ह्यामध्ये अधिक तपास करतांना आरोपीच्या घरातून स्टार प्रजातीचे 04 जिवंत कासव प्राप्त करण्यात आले. सदर आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39(d), 48(a), 49, 49(a), 50 व 51 अन्वये वनपरिक्षेत्र कार्यालय वन्यजीव मुंबई येथे प्रथम वनगुन्हा रिपोर्ट क्र. WL- 01/2020 नोंदविण्यात आला आहे.
Illegal sale of banned wildlife tortoise two arrested from Mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.