Mumbai Rains : पालघर, ठाणे, रायगडमध्ये आजही पावसाचा 'रेड अलर्ट' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पश्‍चिम उपनगरातील सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, जोगेश्‍वरी आणि पूर्व उपनगरातील पवई, भांडूप, मुलुंड आदी परिसरांत शनिवारी पावसाचा मारा सुरूच राहिला. आजही पावसाचा जोर कायम आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी दिवसभर पावसाचा मारा सुरूच राहिला. या पार्श्‍वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत रविवारीही (ता. 4) "रेड अलर्ट' जारी केला आहे.

या भागांत 200 मि.मी.हून अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्‍चिम उपनगरातील सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, जोगेश्‍वरी आणि पूर्व उपनगरातील पवई, भांडूप, मुलुंड आदी परिसरांत शनिवारी पावसाचा मारा सुरूच राहिला. आजही पावसाचा जोर कायम आहे.

शनिवारी सांताक्रूझमध्ये 133.9 मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी दुपारी काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला; मात्र दुपारी 4 वाजल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडला. तो जोर आजही कायम असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे.

मुंबईत रात्रभर तुफान पाऊसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. हार्बर रेल्वेवर चुनाभट्टी येथे तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान साचलं पाणी, कुर्ला-वडाळामधील लोकल वाहतूक ठप्प, अंबरनाथ पलीकडील लोकल वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMD alert on heavy rainfall in Palghar, Thane and Raigad