

मुंबई : पुढील काही दिवसांत मुंबई परिसरात कमाल तापमान ४० अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यातच आर्द्रतेमुळे प्रचंड उकाडा जाणवणार असल्याने मुंबईकर घामाघूम होणार आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवसांत कोकणात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.