

Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : मुंबईत पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कालपासून (रविवार, ता. २६) मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत असून हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात २.२२ टक्के इतकी वाढ झाली आहे.