esakal | अनुभव हिवसाळ्याचा ! ऐन थंडीत बुधवार-गुरुवारी मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

अनुभव हिवसाळ्याचा ! ऐन थंडीत बुधवार-गुरुवारी मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय.

अनुभव हिवसाळ्याचा ! ऐन थंडीत बुधवार-गुरुवारी मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून अरबी समुद्रापर्यंत वातावरणात धुरक्याचा पट्टा तयार झाल्याचा हा परिणाम असून महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बातमी : पहाटे चार वाजता APMC मध्ये पोहोचलेत रोहित पवार, म्हणालेत "शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी APMC ची गरज"

संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यातील काही भागात पावसाच्या सरी देखील कोसळल्या. यामुळे तापमानात काहीशी घट होणार असून मुंबई आणि ठाणे इथे किमान तापमान 16-18 च्या आसपास असेल. तर नाशिक, पुणे इथं 14-16 अंश सेल्सिअस तापमान असेल. 

महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali

कोकणासह दक्षिण-उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी  कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण करत आहेत. भारतीय हवामान खात्यानं देशातील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 

IMD predicts rainfall amid winters in mumbai and konkan regions

loading image