आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करा - अदिती तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 15 जानेवारी 2020


माणगाव तालुक्‍यासाठी राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश 

मुंबई : विद्यार्थी आणि स्थानिकांना दळणवळणाच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आंबेत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग वाढवून काम पूर्ण करावे, तसेच नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी बोट सुरू करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. आज मंत्रालयात रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या माणगाव तालुक्‍यातील आंबेत पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात आणि पर्यायी व्यवस्थेसंदर्भात कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तटकरे बोलत होत्या. 

त्या विनयभंग प्रकरणातील पीडित मुलगी देहरादूनला सापडली

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, पुलाची दुरवस्था पाहता हा पूल अवजड वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक व नागरिकांसाठी कार, जीप, रिक्षा अशा हलक्‍या वाहनांची वाहतूक सुरू आहे. पुलाच्या दुरुस्ती कामामधील बेअरिंग बदलण्याचे काम करताना पूल वाहतुकीसाठी पुढील तीन महिने पूर्णत: बंद करावा लागणार आहे. तत्पूर्वी शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांसाठी पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले. यासाठी मे 2020 पर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलासंदर्भातील सर्वच कामे पूर्ण करावी.

कौटुंबिक कारणांमुळे शर्मिला ठाकरेंनी टाळली मुख्यमंत्र्यांची भेट?

दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून सुरक्षिततेचा विचार करून प्रवासी बोट सुरू करण्यात यावी, असे निर्देश राज्यमंत्री तटकरे यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच नवीन पूल बांधकामाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. या बैठकीस महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. रामस्वामी, डॉ. म. न. डेकारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बिरान बहिर, उपअभियंता पी. एस. राऊत आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediately complete the bridge repair work on AMBET