पीओपीच्या गणेशमूर्तीचे घरच्या घरी 'असे' करा विसर्जन, 'ही' पालिका राबवणार संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati visarjan

जेणेकरून मूर्ती 48 ते 72 तासांच्या आत रसायनमिश्रीत पाण्यात विरघळून जाईल. यामुळे, मुर्तीचे पावित्र्य अबाधित राहून विटंबना टळू शकेल.

पीओपीच्या गणेशमूर्तीचे घरच्या घरी 'असे' करा विसर्जन, 'ही' पालिका राबवणार संकल्पना

ठाणे : गणपती बाप्पाच्या आगमनाला काही तास उरले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झाले आहे. हल्ली सर्रास पीओपीच्या (प्लॅस्टर ऑफ पॅरीस) गणेशमूर्ती पुजल्या जात असल्याने विर्सजनानंतर पाण्यात पीओपीचे विघटन होत नसल्याने मूर्तीची विटंबना होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून घरच्या घरी पाण्यामध्ये अमोनियम बायोकार्बोनेट हे रसायन मिसळून विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस समांतर तपास करणार ? अनिल देशमुख म्हणालेत...

कोरोनाच्या सावटाखाली गणपती बाप्पाचे आगमन होत असताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव पार पाडला जात आहे. ठाणे महापालिकेने देखील श्रींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावासोबतच मूर्ती स्विकृती केंद्र, तसेच विसर्जनस्थळी ऑनलाईन टाईम स्लॉट योजनेद्वारे सुविधा आणि प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जन व्यवस्था राबवण्याचे ठरवले आहे. मात्र, पीओपीचे पाण्यात विघटन होत नसल्याने अशा मूर्तीच्या विसर्जनासाठी पालिकेने अभिनव सूचना केली आहे. त्यानुसार नागरीकांनी शाडूची गणेशमूर्ती पुजावी व घरच्या घरी बादलीत अथवा टाक्‍यांमध्ये विसर्जन करावे. अन्यथा, पीओपीच्या (प्लॅस्टर ऑफ पॅरीस) मूर्तीबाबत विसर्जनासाठी पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मान्यताप्राप्त अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करावा. जेणेकरून मूर्ती 48 ते 72 तासांच्या आत रसायनमिश्रीत पाण्यात विरघळून जाईल. यामुळे, मुर्तीचे पावित्र्य अबाधित राहून विटंबना टळू शकेल. अमोनियम बायोकार्बोनेट उपलब्ध होण्याच्या ठिकाणांची व आस्थापनांची त्यांच्या दरपत्रकासह यादी देखील महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण मंडळाने भाविकांसाठी उपलब्ध केली आहे. 

नक्की वाचा : तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु

मूर्तीची विटंबना टळणार, खतही मिळणार 

विसर्जनानंतर पीओपी पाण्यात विरघळत नसल्याने मूर्तीची विटंबना होते. त्यामुळे मूर्तीच्या वजना इतके अमोनियम बायकार्बोनेट बादली किंवा टाकीमधील पाण्यात टाकून मिश्रण एकजीव झाल्यावरच विसर्जन केल्यास सणाचेही पावित्र्य राखण्यास मदत होईल. मात्र, कुणीही अमोनियम बायकार्बोनेटच्या स्फटिकांचा वास घेऊ नये. तर, निसर्गाच्या देवतेचे अशाप्रकारे विसर्जन केल्यानंतर हे खत मिश्रीत पाणी झाडांना किंवा बागेत टाकण्यास हरकत नाही असेही महापालिकेने सूचवले आहे 

महत्वाची बातमी : CBI सर्वात आधी 'या' गोष्टी घेणार स्वतःच्या ताब्यात, आजच किंवा उद्या CBI ची टीम मुंबईत होणार दाखल

कोव्हिड-19 साथरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणाकरीता ठाणे शहरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेद्वारे मार्गदर्शक सुचनांसह 'पर्यावरणस्नेही उत्सव' साजरा केला जात आहे. गृहसंकुलांनी पीओपीच्या गणेशमूर्तीचे बादली अथवा सिंटेक्‍स टाक्‍यांमध्ये दिलेल्या सुचनेनुसार मुर्तीच्या वजनाइतके अमोनियम बायकार्बोनेट पाण्यात मिसळून करावे. 

- मनिषा प्रधान, प्रदुषण नियंत्रण आधिकारी, ठाणे महानगरपालिका. 

(संपादन : वैभव गाटे)

immerse the idol of Ganesha of POP at home read full story

loading image
go to top