सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिस समांतर तपास करणार ? अनिल देशमुख म्हणालेत...

सुमित बागुल
Wednesday, 19 August 2020

महाराष्ट्र सरकार यावर फेरविचार याचिका दाखल करणार का यावर अनिल देशमुख यांनी मौन बाळगलं.

मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने  निकाल दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सुशांत सिंह राजपूत मुत्यूच्या तपासाबाबत सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्याचं आम्ही स्वागत करतो असं अनिल देशमुख म्हणालेत. या केसमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना जे काही सहकार्य लागेल ते राज्य शासन देईल असंही अनिल देशमुख म्हणालेत. दरम्यान, मुंबई पोलिसांबाबत अभिमानाची गोष्ट म्हणजे , सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष नाहीत असं स्पष्ट म्हटलंय. मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्य पद्धतीने झालाय हेही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जी राज्यघटना दिली आहे, या राज्य घटनेत जी संघ राज्याची संकल्पना आहे किंवा फेडरल स्ट्रक्चरची जी संकल्पना आहे, त्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेबाबत आपल्या घटना तज्ज्ञांनी विचार मंथन करावं अनिल देशमुख यांनी सुचवलंय.  CBI ला तपास द्यायचा का नाही हा राज्य शासनाचा अधिकार असतो. राज्य शासनाने 'NOC' म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर तो तपस CBI कडे जातो. मात्र आता सुप्रीम कोर्टाने याबाबत दिलेल्या निकालानंतर राज्य शासन सुशांत सिंह राजपूत मृत्यू तपास केसमध्ये CBI ला सहकार्य करेल.

मोठी बातमी - सुशांत सिंह प्रकरण, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा, मुंबईत मोठ्या घडामोडी

विरोधी पक्षाकडून राजकारण 

बिहारमध्ये पुढच्या काही काळात निवडणुका आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून या प्रकरणात राजकारण केलं जातंय. केवळ निवडणुका लक्षात घेऊन काही नेते यामध्ये राजकारण आणतायत. मात्र सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलिसांनी अत्यंत प्रोफेशनली यामध्ये तपास केला हे  अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अनिल देशमुख म्हणालेत. 

मुंबई पोलिस समांतर तपास करणार ? 

महाराष्ट्र सरकार यावर फेरविचार याचिका दाखल करणार का यावर अनिल देशमुख यांनी मौन बाळगलं. सोबतच पत्रकारांनी अनिल देशमुख यांना, "मुंबई पोलिस समांतर तपास सुरु ठेवणार असं म्हणतायत" याबाबत काय सांगाल असं विचारलं . त्यावर गृहमंत्री म्हणालेत की, सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं आहे त्यात सुप्रीम कोर्टाने त्याबात एका परिच्छेदात काहीतरी उल्लेख आहे, त्यानुसार राज्य शासन विचार करेल असंही अनिल देशमुख म्हणालेत. 

maharashtras home minister anil deshmukh on verdict given by supreme court on sushant singh rajaput case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtras home minister anil deshmukh on verdict by supreme court in sushant singh rajaput case