
भाजपच्या मातृसंस्थेची इच्छा पूर्ण होईल : छगन भुजबळ
मुंबई : आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत, असे भाजप वरवर दाखविण्याचा प्रयत्न करतो. मात्र एकाबाजूला ते ओबीसींच्या हिताच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातात. दुसऱ्या बाजूला इम्पिरिकल डेटा देत नाहीत. कदाचित भाजपच्या मातृसंस्थेला जे हवे आहे, ते जर राजकीय चाकोरीतून होत नसेल तर ते न्यायालय आणि इतर माध्यमातून होईल. आरक्षण नष्ट होईल असे प्रयत्न असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
ते म्हणाले, की भाजपने महाविकास आघाडी सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशने जसे कायदे केले होते, तसे कायदे महाराष्ट्राने केले. मात्र त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका काहींनी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राबाबत जो निर्णय दिला, तोच निर्णय मध्य प्रदेशसाठी दिला आहे. आम्हाला इम्पिरिकल डेटा डेटा दिला असता तर आज इतर राज्यांवरही संकट आले नसते.
भाजपच्या अशा धोरणांमुळे संबंध देशातील ओबीसी समाजावर संकट आले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पूर्ण प्रयत्नशील असून ओबीसींना न्याय मिळवून देईल.
- छगन भुजबळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री
Web Title: Imperial Data Chhagan Bhujbal On Bjp Obc Reservation Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..