esakal | डाईमेकींग उद्योगास सहाय्य करून व क्लस्टर सारख्या योजना राबवू - खासदार राजेंद्र गावित
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डाईमेकींग उद्योगास सहाय्य करून व क्लस्टर सारख्या योजना राबवू - खासदार राजेंद्र गावित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सफाळे : कोरोनामुळे (corona) कंबरडे मोडलेल्या डाईमेकिंग (Dye making) व्यवसायाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयामार्फत क्लस्टरसारख्या (Cluster) योजनेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरचे अद्ययावत तंत्रज्ञान व त्यावर चालणारी यंत्रे उपलब्ध झाल्यास या उद्योगाला नवसंजीवनी मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न सुरूअसून पाठपुरावा केला जात असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर, चिंचणी ते धाकटी डहाणू परिसरातील सुमारे २५ गावांमधून मागील ९० वर्षांपासून दागिने घडविण्याचे साचे बनविण्याचा डाईमेकिंग हा हस्तकलेशी निगडित उद्योग पारंपरिक पद्धतीने केला जातो. हा उद्योग पन्नास ते साठ हजार लोकांच्या रोजंदारी आणि उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. असंघटित क्षेत्रात असल्यामुळे कामगारांना आवश्यक गोष्टींचा लाभ मिळत नाही.

हेही वाचा: वसई -विरार : कोविड-१९ लसीकरण मोहिमेला आता 'राजकीय वळण'

कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच सर्व डाईमेकर वर्गाचा अंतर्भाव असलेली ‘डाईमेकर उत्कर्ष सेवा संघ’ नावाची एक मध्यवर्ती नोंदणीकृत संस्था येथील कारागिरांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व सरकारी यंत्रणांचे सहकार्य प्राप्त व्हावे, यासाठी खासदार राजेंद्र गावित यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजन करण्यासाठी मागणी केली आहे

loading image
go to top