esakal | वसई विरार : लसीकरणाच्या श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली
sakal

बोलून बातमी शोधा

वसई -विरार : कोविड-१९ लसीकरण मोहिमेला आता 'राजकीय वळण'

वसई -विरार : कोविड-१९ लसीकरण मोहिमेला आता 'राजकीय वळण'

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : वसई (Vasai) विरारकरताना जून पासून लसीकरण (Vaccination) सुरु झाले असले तरी लसीसाठी रात्र रात्र जागावे लागत असताना आज पालघर (Palghar) जिल्ह्यात २ लाख लस आल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी सारेच पक्ष पुढे आले आहेत. त्यातून आता या ठिकाणी लसीकरणाच्या (Vaccination) श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली असून हे सर्व येणाऱ्या निवडणुका (Election) डोळ्या समोर ठेऊन चाललेले राजकारण (Politics) असल्याचे याठिकाणी बोलले जात आहे.

गेले तीन महिने येथील लोकांना लस मिळत नसताना श्रेय घेणारे कुठे होते? इतर जिल्ह्याला लस मिळत असताना पालघर जिल्ह्याला लस का मिळत नव्हती . याची उत्तरेही श्रेय घेणार्यानी द्यायला हवीत अशी अपेक्षा येथील नागरिक करत आहेत. मुळात येथील नागरिकांना लस उपलब्ध करून देणे हि राज्यशासनाची जबाबदारी असताना याठिकाणी आलेल्या लसीवरुन राजकारण मात्र रंगले आहे.

वसईतील कोविड-१९ लसीकरण मोहिमेला आता 'राजकीय वळण' मिळाले आहे. आगामी वसई-विरार महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेचा वापर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या प्रचाराकरता करताना दिसत आहेत. काल पालघर जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २ लाख कोविशिल्ड लसींचे 'क्रेडिट' घेण्याकरता बविआ-शिवसेना आणि भाजप यांच्यात असेच मोठे 'सोशल मीडिया वॉर' झालेले पहायला मिळाले.त्या आधी वसई-विरार महापालिकेची लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीने सुरु होती. रात्रभर रांगा लावूनही पालिकेकडून लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी दर्शवली होती. पालिकेच्या या 'संथ' कारभाराचा फायदा बहुजन विकास आघाडीने उठवत खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने शहरात 'पेड़ लसीकरण' मोहिमा आयोजित केल्या होत्या.

बहुजन विकास आघाडीच्या 'पेड़' ; पण 'नियोजित' कारभारामुळे नागरिकांनीदेखील या मोहिमांना पसंती दिली होती. मात्र बविआ या मोहिमांत आघाडी घेत असल्याचे पाहून शिवसेना-भाजप व अन्य पक्षांनी या विरोधात रान उठवले होते. बविआ या माध्यमातून आपली प्रचार मोहीम राबवत असल्याचा आक्षेप नोंदवताना;पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लस उपलब्ध करून त्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी या पक्षांनी केली होती. तर वसई-विरार महापालिकेच्या लसीकरण मोहिमेतील ढिसाळ कारभाराविरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली काही महिने अगोदरच पालिकेसमोर आंदोलन केले होते.

हेही वाचा: बेळगाव: पहिल्‍याच प्रयत्‍नात सत्ता, भाजपची जोरदार मुसंडी

दरम्यानच्या काळात वसई-विरार महापालिकेला मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे या मोहिमेला वेग आला आहे. पालिकेवर प्रशासकाआडून सत्ता ठेवून असलेली शिवसेना मागील काही दिवसांत प्रचंड सक्रिय झाली आहे. मात्र मधल्या काळात शिवसेनेने बहुजन विकास आघाडीला मोठ्या प्रमाणात 'टाचे'खाली ठेवले. या दोघांच्या लढाईत भाजपने अनेकदा विविध आंदोलनांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. ; मात्र त्यांचा पाडाव लागला नाही. आज पुन्हा एकदा हे तिन्ही पक्ष श्रेय आपलेच असल्याचे सांगत आहेत. पालघर जिल्ह्याला काल तब्बल २ लाख लसी प्राप्त झाल्या आहेत. पैकी एक लाख लसी वसई-विरार महपालिकेकरता असणार आहेत. या माध्यमातून लसीकरणाचा नवा उच्चअंक प्रस्थापित होणार आहे.

हेही वाचा: 'बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता कायम ठेवा'

या सगळ्याचे क्रेडिट शिवसेनेने आपले असल्याचे म्हटले आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मालवीय, केंद्रीय ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार व राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे हे शक्य झाले असल्याचे म्हटले आहे.तर दुसर्या बाजूला बहुजन विकास आघाड़ीने आमदार क्षितिज ठाकूर व माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे; तर आमदार राजेश पाटील, माजी महापौर नारायण माणकर व माजी खासदार बळीराम जाधव यांनी दिल्ली दरबारी धाव घेतली होती, असे म्हटले आहे.

या दोघांवर कडी म्हणून भाजपने खासदार विकास महातमे यांचे केंद्रीय ग्रामीण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार यांना लिहिलेले पत्र दाखवून हे श्रेय आपलेच असल्याचा पुरावा दिला आहे.यामुळे आता गेले वर्षभर रखडलेली वसई विरार पालिकेची निवडणूक लवकरच लागणार असल्याचे संकेत मात्र मिळू लागले आहेत.

loading image
go to top