भिवंडी पालिका आयुक्तांचा रुग्णवाहिकेबाबत महत्वपूर्ण निर्णय

bhiwandi
bhiwandi

भिवंडी : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दोन- दोन रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमधील आपत्कालीन कक्ष येथे नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आपत्कालीन कक्षप्रमुख फैझल तातली यांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

या सुविधेचा नागरिकांसह रूग्णांंनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धूळे यांनी केले आहे. आपत्ती निकडीच्या कामाकरिता पालिकेत आपत्कालीन कक्षात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी 24 तास अधिकारी, कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

नागरिकांना येणाऱ्या समस्या तसेच खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करताना येणाऱ्या अडचणी, अन्य तक्रारी सोडवण्यासाठी पालिकने टोल फ्री क्रमांक 18002331102 असा आहे, तर आपत्कालीन कक्षाचा क्रमांक 250049, 232398 असा आहे. त्याचबरोबर टाटा आमंत्रा, रईस हायस्कूल, ओसवाल हायस्कूल या कोरोना केंद्रावर देखील रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. तसेच इंदिरा गांधी हॉस्पिटल, टाटा आमन्त्रा येथे शववाहिका उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Important decision of Bhiwandi Municipal Commissioner regarding ambulance

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com