BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

सुनीता महामुणकर
Friday, 22 January 2021

टीआरपी प्रकरणात आरोपी असलेले दासगुप्ता यांचे आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे WhatsApp चॅट नुकतेच लिक झाले आहे

मुंबई, ता. 22 : फेक टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले  ब्रॉडकास्ट रिसर्च काउन्सिलचे  (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या जामीनावर आज सांयकाळी तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र सोमवारी त्यांची वैद्यकीय कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

टीआरपी प्रकरणात आरोपी असलेले दासगुप्ता यांचे आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे WhatsApp चॅट नुकतेच लिक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज दासगुप्ता यांनी सांयकाळी उशिरा उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. दासगुप्ता यांना उपचारासाठी जे जे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने उशिरा उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. याचिकेवर न्या. पी डी. नाईक यांच्या दालनात तातडीने सुनावणी घेण्यात आली. 

महत्त्वाची बातमी : भाजपचा महाविकास आघाडीला खणखणीत टोला, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर भातखळकर कडाडले

दासगुप्ता यांची प्रक्रुती अद्यापही ठीक नाही. त्यामुळे त्यांना खासगी हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करावे, अशी मागणी केली आहे. न्या. नाईक यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र सोमवारी यावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्यांचे वैद्यकीय अहवाल दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले. प्रमुख सरकारी वकील दिपक ठाकरे यांनी दासगुप्ता यांच्या याचिकेला विरोध केला आहे. दासगुप्ता यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, असा दावा त्यांनी केला.

फेक TRP प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. दासगुप्ता यांचा जामीन अर्ज यापूर्वी सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.

Important decision of Mumbai High Court former BARC CEO Partho Dasgupta


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important decision of Mumbai High Court former BARC CEO Partho Dasgupta