Coronavirus : सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कामावर असताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबई : कामावर असताना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. तसे परिपत्रकही प्रसिध्द करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार वारसांना नोकरी मिळणार आहे. 

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

महापालिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह साधारण 35 हजाराहून अधिक कर्मचारी, अधिकारी कोव्हिडची साथ रोखण्यासाठी व नागरिकांना मदत पोहोचविण्यासाठी दिवसरात्र राबत आहेत. आतापर्यंत पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला; तर तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे कारणही कोरोना असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबिंयांसाठी पालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी : लॉकडाऊन इफेक्ट ! विकासकामं रखडल्याने कोट्यवधींचा निधी वाळ्या जाणार?

शैक्षणिक पात्रतेनुसार कामगार, वॉर्डबॉय, हमाल, आया, कार्यलयीन शिपाई, कार्यकारी सहाय्यक (लिपिक), कनिष्ट लेखा परीक्षक, लेखा सहाय्यक या पदावर वारसांची नियुक्ती केली जाणार आहे.

 

Important decision of Mumbai Municipal Corporation regarding serving employees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important decision of Mumbai Municipal Corporation regarding serving employees