'एसबीआय'चा कर्जदारांना दिलासा तर ठेवीदारांना झटका!

वृत्तसंस्था
बुधवार, 11 मार्च 2020

सार्वजनिक क्षेत्रातील  स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) 0.10 ते 0.15 टक्क्याची कपात केली आहे. तसेच ठेवींवरील व्याजदरात देखील महिनाभरात बँकेने दुसऱ्यांदा कपात केली आहे.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील  स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) 0.10 ते 0.15 टक्क्याची कपात केली आहे. तसेच ठेवींवरील व्याजदरात देखील महिनाभरात बँकेने दुसऱ्यांदा कपात केली आहे. परिणामी 'एसबीआय'च्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार आहे. तर कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.  बँकेने 4 ते 45 दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्का तर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात बँकेने 0.10 टक्के कपात केली आहे. नवीन व्याजदर येत्या 10 मार्चपासून लागू करण्यात आलेले आहेत. 

येस बँकेच्या खातेदारांसाठी 'गुड न्यूज'; 'या' सेवा पुन्हा सुरु

'एमसीएलआर'मध्ये कपात
बँकेकडून चालू आर्थिक वर्षात सलग दहाव्यांदा 'एमसीएलआर'मध्ये कपात करण्यात आली आहे. या अगोदर फेब्रुवारी महिन्यात देखील एमसीएलआर दरात  0.05 टक्क्याची कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर एक वर्षासाठीचा'एमसीएलआर' आता 7.85 टक्क्यांवरून 7.75 टक्के करण्यात आला आहे. 

10 मार्चपासून व्याजदर खालीलप्रमाणे :                    
ओव्हरनाईट :    7.45   टक्के
एक महिना :     7.45   टक्के
तीन महिने :     7.50   टक्के
 सहा महिने :     7.70    टक्के
1 वर्षे :             7.75 टक्के
2 वर्षे :             7.95 टक्के
3 वर्षे :            8.05 टक्के

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात
बँकेने विविध कालावधीच्या आणि रकमेच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात देखील कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ ठेवीदारांसाठी 2 कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदरात 0.10 ते 0. 50 टक्क्याची कपात जाहीर केली आहे. तर 2 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या ठेवींवर व्याजदर 'जैसे थे' आहेत. 

मुदत ठेवींवरील व्याजदर खालीलप्रमाणे :
कालावधी         नवीन व्याजदर 
7-45 दिवस:        4 टक्के                  
46-179  दिवस:    5 टक्के
180-210  दिवस :   5.50  टक्के
 211 दिवस - 1 वर्ष  :   5.50 टक्के
1 ते 10 वर्षे :           5.9  टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important decision Taken by SBI