मुंबईतील 'हर्ड इम्यूनिटी'बाबत महत्त्वाची माहिती समजणार, कारण मुंबईत आता सुरु झालंय...

समीर सुर्वे
Monday, 10 August 2020

मुंबईत सेरो सर्वेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 12 दिवसात सर्वेक्षण पुर्ण होणार आहे.

मुंबई : मुंबईत सेरो सर्वेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 12 दिवसात सर्वेक्षण पुर्ण होणार आहे. या सेरोलॉजिकल सर्वेक्षणातून मुंबईच्या कोविड विरोधातील सामुहिक प्रतिरोध शक्ती (हर्ड इम्यूनिटी)  बद्दल माहिती मिळू शकेल.

सेरो सर्वेक्षणातील नागरीकांच्या रक्तातील अँटीबॉडीजचा अभ्यास केला जातो. यापुर्वी गेल्या महिन्यात दहिसर म्हणजेच आर उत्तर वॉर्ड, चेंबूर म्हणेज एम पुर्व वॉर्ड आणि दादर पुर्व, माटूंगा शिव म्हणजे एफ उत्तर  या प्रभागात सर्वे झाला होता. त्यात झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के आणि बिगर झोपडपट्टी परीसरातील 16 टक्के नागरीकांमध्ये कोविड विरोधातील प्रतिदव्येे आढळली होती. म्हणजे झोपडपट्ट्यांमधील 57 टक्के नागरीकांना कोविडची बाधा झाली होती. त्यांच्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीने कोविडवर मातही केली होती.आताही याच प्रभागांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

मोठी बातमी - मुंबईकरांसाठी तब्बल सात तास मॅनहोलपाशी दिला खडा पहारा, स्वतःच घर मात्र पावसात गेलं वाहून

मुंबई महानगरपालिकेसह निती आयोग, टाटा मुलभूत संशोधन संस्था या सर्वेक्षणात सहभागी होणार असून पुढील 12 दिवसात हे सर्वेक्षण पुर्ण होईल असं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय. या दोन्ही सर्वेक्षणाच्या आधारावरुन मुंबईतील कोविड विरोधातील हर्ड इम्यूनिटीबाबत अधिक ठाम पणे सांगता येऊ शकते असेही सांगण्यात आले.

हर्ड इम्यूनिटी म्हणजे काय 

साथीच्या विषाणूवर औषध नसल्यास माणसाच्या शरिरात या विषाणूचा सामना करणारी प्रतिकारक शक्ती तयार होते. त्यास वैद्यकिय भाषेत रक्तातील प्रतिद्रव्ये असे म्हटले जाते. तर, एखाद्या ठिकाणच्या 70 टक्के नागरीकांना साथीच्या आजाराची बाधा झाल्यानंतर ही प्रतिकारक शक्ती नैसर्गिक रित्या तयार होते. असे वैद्यकिय क्षेत्रात मानले जाते. त्यालाच हर्ड इम्यूनिटी असे म्हणतात.

मोठी बातमी - तब्बल एक हजार कोटींचा अवैध माल; नाव्हा शेव्हाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, कसं डोकं वापरलेलं वाचा

( संकलन - सुमित बागुल )

important information about herd immunity of mumbai will reveal sero survey starts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important information about herd immunity of mumbai will reveal sero survey starts