विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी! सीईटीसाठी शेवटची संधी; 'या' तारखेला भरता येणार अर्ज

तेजस वाघमारे
Sunday, 6 September 2020

प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता सोमवारी (ता. 7) आणि मंगळवारी (ता. 8) अर्ज भरता येणार आहेत.

मुंबई: लॉकडाऊनमुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता सोमवारी (ता. 7) आणि मंगळवारी (ता. 8) अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नोंदणीची ही शेवटची संधी असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. 

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

राज्यातील अभियांत्रिकी, औषधी, स्थापत्यशास्त्र, कृषी, हॉटेल मॅनेजमेंट आणि लॉ अभ्यासक्रम यांसारख्या 12 विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा बंधनकारक आहे. 1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान ही परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले होते. सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे अर्ज अनेक विद्यार्थी भरू शकले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना नवीन अर्ज करता येणार नाही, महितीमध्ये बदल करता येणार नाही. तसेच आधीचे शुल्कही परत मिळणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important news for you students! Last chance for CET; Applications can be filled on Monday, Tuesday