फ्लेमिंगो सफारीला उत्स्फूर्त प्रतिसाद

फ्लेमिंगो सफारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
फ्लेमिंगो सफारीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई : ऐरोलीतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी बोटीतून १५ नोव्हेंबरपासून खाडीतून फ्लेमिंगो सफारी सुरू करण्यात आली. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे  फ्लेमिंगो पक्षी येण्यास उशीर झाला असून, डिसेंबर अखेरपर्यंत रोहित पक्षी मोठ्या संख्येने येतील असा अंदाज आहे; मात्र रोहित पक्षी बघण्यासाठी खाडीसफरीला १५ दिवसांत २५० पेक्षा अधिक जणांनी बोटिंगने प्रवास केल्याचे समोर आले आहे. 

कांदळवन केंद्राला नोव्हेंबर महिन्यात १६०० जणांनी भेट दिली. यातून एक लाख पन्नास हजाराचे उत्पन्न कांदळवन विभागाला मिळाले. त्याचप्रमाणे आता पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सागरी जैवविविधतेची अधिक माहिती करून देण्यासाठी वन विभागाच्या वतीने मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऐरोलीतील २६ किलोमीटरच्या खाडी परिसरात २०० हून अधिक पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडीकिनाऱ्यावर दरवर्षी आश्रयाला येतात. यात पेटंट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर आदी परदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. खाडीतील विविध प्रकारच्या जैवविविधतेची माहिती आणि खाडीकिनाऱ्यांचे महत्त्व, किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे. पक्षीनिरीक्षक आणि पर्यावरण यांची माहिती होण्यासाठी या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना ही सफर घडवण्यात येणार आहे. या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना सागरी पट्टा, कांदळवन इतर जैवविविधतेची माहिती देण्यासाठी संग्रहालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याकरिता खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ रुपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश दिला जातो; तर शासकीय शाळेतील बुधवारी मोफत प्रवेश दिला जातो. याद्वारे पुढील तीन वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांना याची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बोटिंग सफारी
यंदा हिवाळा लांबल्याने रोहित (फ्लेमिंगो)च्या हंगामाला उशिरा सुरुवात झाली; मात्र आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोची उपस्थिती वाढली असल्याने पक्षीप्रेमी यांचा खाडीसफरीकडे कल वाढला आहे.

या केंद्रात परदेशी विद्यार्थ्यांसह शहरातील खासगी शालेय विद्यार्थीदेखील या केंद्राला भेट देत आहेत; मात्र पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंतदेखील सागरी किनारपट्टी, कांदळवन, जैवविविधता यांची माहिती होण्यासाठी त्यांनादेखील सामावून घेण्याचे नियोजन आहे. तीन वर्षांत १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे.
- एन. जे. कोकरे, वन परीक्षेत्र अधिकारी, वन विभाग ऐरोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com