

uddhav thackeray
esakal
मिरा भाईंदरमधील अजित पवार गटाचे नेते इमरान हाशमी, आनंद सिंग आणि भाजपच्या स्वप्नाली म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात हार्दिक स्वागत केले. ह्या प्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हासंघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.