मृतदेहांवर अंत्यसंस्कारात अत्याधुनिक तंत्र वापरा - उच्च न्यायालय

ज्यामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण होणार नाही.
cremation
cremation

मुंबई: कोरोना संसर्गात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना (cremation process) अत्याधुनिक तंत्राचा (advanced technology) वापर करावा, ज्यामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण होणार नाही, असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (high court) आज प्रशासन यंत्रणांना दिले. मृतांचा आकडा वाढत आहे, अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञान स्मशानभूमीत वापरायला हवे, असे मत एका याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने व्यक्त केले. (In cremation process use advanced technology high court)

पुण्यातील वैकुंठ भूमीबाबत रहिवासी विक्रांत लाटकर यांनी एड असीम सरोदे,. एड अजीत देशपांडे आणि एड अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. पुण्यात सध्या दिवसात सुमारे शंभर मृतदेहांवर अंत्यविधी केले जातात. मात्र पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे परिसरात प्रदूषण निर्माण होत आहे, असे सरोदे यांनी सांगितले.

cremation
म्युकर मायकोसिस आजार: एका औषधाबद्दल सूचना

पुणे महापालिकेला याबाबत लेखी खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने एड अभिजित कुलकर्णी यांना दिले. सर्वच प्रशासनांनी प्रदूषण कमी होणारी यंत्रणा स्मशानभूमीत राबवायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

cremation
'सामान्य माणसासाठी नियम पण शिवसैनिकांसाठी नाही?'

हडपसर येथील वैकुंठ येथे पीएमसीच्या सहा स्मशानभूमी आहेत. तसेच पुण्यात धनकवडी, कात्रज, येरवडा आणि कैलास आहेत. परंतु येथील मशीन्स योग्यप्रकारे कार्य करत नाहीत, वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचे निकष पूर्ण करत नाही, त्यामुळे गडद काळा धूर निर्माण होतो, असा दावा याचिकेत केला आहे. येथील वातावरणाची चाचणी करावी, जनजागृती करावी इत्यादी मागण्या याचिकेत केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com