esakal | IPL सामन्यांवर सट्टेबाजी, तिघांना मुंबईतून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

ipl

IPL सामन्यांवर सट्टेबाजी, तिघांना मुंबईतून अटक

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना, दुसऱ्या बाजूला आयपीएलचे सामनेही सुरु आहेत. मुंबईत आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या तिघांना N.M. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा: ‘दर्शन’ गाजवणार आयपीएल स्पर्धा!, किंग्स इलेवन पंजाबमध्ये तिसऱ्यांदा निवड!

आयपीएलमधील राजस्थान रॉयलचा संघ ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येथांबलाय, त्याच हॉटेलमधून हे तिघे चेन्नई आणि पंजाबच्या सामन्यावर सट्टा लावत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.

या कारवाई दरम्यान काही मुद्देमालही जप्त केला.संबधित बुकी आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल या संघाचा काही संबध नाही. आरोपींकडून आठ मोबाइल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे