
डोंबिवली : ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सुतोवाच खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा उत्साह दहीहंडी उत्सवात देखील दिसून आला आहे. कल्याण ग्रामीण मध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे एकत्रित फोटो बॅनर वर झळकवत, गोविंदा मंडळाने कल्याण लोकसभा आणि कल्याण ग्रामीण विकासाचा नवा अध्याय असा संदेश दिला आहे. यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवलित चर्चा सुरु झाली आहे.