कल्याण मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष पेढे भरवत फटाके वाजवून केला जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

कल्याण मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष पेढे भरवत फटाके वाजवून केला जल्लोष

डोंबिवली : संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच कल्याण मध्ये उद्धव ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत, एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जल्लोषात सामील झाले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका होऊन ते बाहेर येतात कल्याण मध्ये कल्याण जिल्हा प्रमुख सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही दडपणाला न घाबरता पक्षासाठी लढणारे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेची तोफ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. शंभर दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर होऊन ते बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांनी हा आनंदोत्सव कल्याणात साजरा केला.