केईएम रुग्णालयात म्युकरमायकोसिससाठी स्पेशल टीम

कोरोनातून बरे झाल्यानंतक म्युकरमायकोसिसमुळे डोळे, जबड्यांवर परिणाम
kem hospital
kem hospital

मुंबई: कोविड 19 ने ग्रस्त असलेले रुग्ण आता मोठया प्रमाणात म्युकरमायकोसिस (mucormycosis diseases) या बुरशीजन्य आजाराने त्रासले आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या हे केसेस वाढत असून यावर उपचार करण्यासाठी मल्टिडिसिप्लीनरी टीमची आवश्यकता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी स्पष्ट केले आहे. (In kem hospital Specialist doctors team for mucormycosis diseases)

याच पार्श्वभूमीवर मुंबईतील केईएम रुग्णालयात म्युकरमायकोसिससाठी एक मल्टिस्पेशालिटीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यात कान-नाक-डोळे विभाग (सर्जन), नेत्रतज्ज्ञ( सर्जन) आणि न्यूरोसर्जन या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल. शिवाय, यात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि फिजिशियन्स ही येऊ शकतात. तसंच, या उपचारांचा आणि शस्त्रक्रियेचा खर्च जास्त असल्याने रुग्णालयातर्फे क्राऊड फंडिंग केले जाणार आहे.

kem hospital
"जशास तसं उत्तर द्यावंच लागतं, पण म्हणून आम्ही शत्रू नाही"

म्युकरमायकोसिससाठी टास्क फोर्स -

केईएम रुग्णालयातील डॉक्टरांची टीम मिळून एक म्युकरमायकोसिस टास्क फोर्स तयार केला गेला आहे. या टीमच्या आधारे रुग्णाचे लवकर निदान होऊन उपचार होण्यासाठी मदत होईल. कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिस होऊ नये म्हणून चेस्ट फिजीओथेरपीही दिली जात आहे. जेणेकरुन फिजीओथेरपीने त्यांच्या नाकातला शेंबूड बाहेर येऊन फुप्फुसांना ऑक्सिजन योग्य पुरेल. शिवाय, मधुमेह नियंत्रित राहावा म्हणून एंडोक्रायनॉलॉजिस्टच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेल्या रुग्णांना हा आजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

kem hospital
Big Breaking: सचिन वाझेवर मोठी कारवाई; पोलिस आयुक्तांचे आदेश

रुग्णालयात 34 रुग्णांवर उपचार सुरू

गेल्या वर्षीच्या लाटेत 11 म्युकरमायकोसिसचे रुग्ण केईएम रुग्णालयात दाखल झाले होते. तर, या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत एकूण 34 रुग्ण म्युकरमायकोसिसचे दाखल असून यात 7 महिला आणि 27 पुरूषांचा समावेश आहे अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, नायरमध्ये मागील दोन आठवड्यात पोस्ट कोविड ओपीडीत 2 ते 3 रुग्ण दिसून आले आहेत. पोस्ट कोरोना ओपीडी विविध वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञ तपासणी करतात. या तपासणीमुळे कोरोनानंतर निर्माण होणाऱ्या गुतांगुतीवर तज्ज्ञ रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत.

सायन रुग्णालयात मागच्या दोन महिन्यांत 30 हून अधिक रुग्ण

सायन रुग्णालयात दर आठवड्याला 2 ते 3 रुग्णांमध्ये म्युकरामायकोसिस आजाराचे निदान होते आहे. कोरोनापूर्वी वर्षाला केवळ आठ रुग्णांना या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण होते. परंतु, आता दोन महिन्यात 30 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोविड रुग्णांना मधुमेह असेल तर या आजाराचा धोका अधिक आहे, त्यात कोरोनाच्या उपचार प्रक्रियेत स्टेरॉयडचा वापर केला जातो. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊन काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका संभावतो. 

डोळ्यातील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यावर हा आजार जीवघेणा ठरतो. अशा स्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी सायन रुग्णालयातील एकूण 30 बाधितांपैकी 11 ते 12 रुग्णांचा एक डोळा काढण्यात आला. तर एका 47 वर्षीय महिला रुग्णाचे दोन्ही डोळे काढण्यात आले, त्यानंतर तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

100 हून अधिक रुग्णालयांमध्ये उपचार -

राज्यातील बऱ्याच रुग्णालयांमध्ये आता हे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मल्टिडिसिप्लनरी डॉक्टरांवर याचे उपचार अवलंबून आहेत. डोळ्यांचे डॉक्टर, कान-नाक-घसा आणि न्यूरोलॉजिस्ट अशा डॉक्टरांची गरज लागते. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात यावर विशेष उपचार होतीलच असे नाही. खासगी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावरील उपचार होऊ शकतील यासाठी प्रयत्न केले जातील. किमान 100 रुग्णालयांमध्ये यावरील उपचार केले जातील. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत हे औषध बसत नसेल तर राज्यसरकारकडून रुग्णालयांना हे औषध पुरवले जातील.

म्युकरमायकोसिसवर लागणारे एन्फोटेरेसीन बी या औषधाच्या 1 लाख वायल्सची ऑर्डर हाफकिनकडे दिली आहे. हाफकिन या संदर्भात तीन दिवसांचे निविदा काढून हे इंजेक्शन उपलब्ध करुन देणार आहे. याची किंमत तिपटीने वाढली असून एनपीपीएला पत्र लिहून एमआरपी करण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com