esakal | विदर्भातील व्यावसायिकाने मुंबईतील हॉटेलमध्ये मॉडेलवर केला बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

विदर्भातील व्यावसायिकाने मुंबईतील हॉटेलमध्ये मॉडेलवर केला बलात्कार

sakal_logo
By
अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: टिंडर अॅप्लिकेशनवर (Tinder app) झालेल्या ओळखीतून मॉडेल तरुणीला वाढदिवसानिमित्त पंचतारांकीत हॉटेलमध्ये (fivestar hotel) बोलावून तिच्यावर बलात्कार (rape) केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी व्यावसायिक तरुणाविरोधात वरळी पोलिसांनी (worli police) गुन्हा दाखल केला. घटनेनंतर तरुणी कुपर रुग्णालयात उपचासाठी दाखल झाली होती. याप्रकरणी तिने वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा गुन्हा वरळीत वर्ग करण्यात आला आहे. (in mumbai hotel raped on model by Vidarbha businessman dmp82)

तक्रारदार तरुणी ही व्यवसायाने मॉडेल असून वर्सोवा येथे राहते. तिच्या तक्रारीवरून व्यावसायिकाविरोधात भांदवि कलम 328(गुंगी येणारा पदार्थ देणे) व 376( बलात्कार) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळ यांनी दिली. तक्रारीनुसार महिन्याभरापूर्वी टिंडर अॅप्लिकेशनवरून तरूणीची आरोपी सोबत ओळख झाली होती. तेव्हापासून दोघेही नियमीत चॅट करत होते.

हेही वाचा: KDMC : वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी मिळणार ३३ कोटींचा निधी

त्याने सोमवारी आपला वाढदिवस असून त्याने पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी दिल्याचे तिला सांगितले. ती सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास तेथे गेली. त्यावेळी पिण्यामध्ये काहीतरी गुंगीचा पदार्थ या तरुणीला देण्यात आला. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपी तरूणीने केला आहे.

हेही वाचा: कांदिवलीत शिवसैनिकांकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण, चौघांना अटक

घरी गेल्यावर त्या तरुणीला त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला कुपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिने आपल्यावर घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिने याप्रकरणी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली. प्रकार वरळी पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो वरळी पोलिसांना वर्ग केला. याप्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून ते विदर्भात गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी बलात्कार झाला त्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असून तो रूम आरोपीच्या नावावरच बुक करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top