esakal | माटुंग्यात दादागिरी करणाऱ्या क्लीन अप मार्शलला नागरिकांनी चोपलं | clean up marshal
sakal

बोलून बातमी शोधा

माटुंग्यात दादागिरी करणाऱ्या क्लीन अप मार्शलला नागरिकांनी चोपलं

माटुंग्यात दादागिरी करणाऱ्या क्लीन अप मार्शलला नागरिकांनी चोपलं

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: विनामास्क (witout mask) फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसुलीसाठी नेमलेले क्लीन अप मार्शल्स (clean up marshal) आणि सर्वसामान्यांमध्ये वाद, हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. काल मुंबईतील माटुंगा (Matunga) चौकात क्लीन अप मार्शल आणि काही नागरिकांमध्ये वाद (row) झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एक वाहतूक पोलीसही दिसत आहे.

क्लीन अप मार्शलच्या भोवती नागरिक जमा झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या क्लीन अप मार्शलच्या हातात एक दगड असून तो नागरिकांना दगड फेकून मारण्याची धमकी देताना दिसत आहे. एका नागरिकाच्या पोटात या क्लीन अप मार्शलने गुद्दाही लगावला. त्यानंतर आक्रमक झालेल्या लोकांनी या क्लीन अप मार्शलला चांगलाच चोप दिला.

हेही वाचा: मुंबईसह 7 शहरांमध्ये घरांच्या विक्रीत 113 टक्क्यांची वाढ

डोक्यात हेल्मेटही मारले. त्यानंतर या क्लीन अप मार्शलने तिथून पळ काढला. मुंबईत क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये वादाच्या हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. पण मुंबई महापालिकेने क्लीन अप मार्शलच्या मुद्यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

loading image
go to top